गोवा : आजपासून तापमानात 5 अंशाने वाढ शक्य | पुढारी

गोवा : आजपासून तापमानात 5 अंशाने वाढ शक्य

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात दि. 8 ते 10 मार्च दरम्यान तापमान कमाल सामान्य तापमानापेक्षा 4 ते 5 अंशाने वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्तकेली आहे. तर शनिवारी (दि.11) तापमानात 2 अंशाने घट होण्याची शक्यता आहे. याकाळात हवामान कोरडे राहणार आहे. दोन दिवस तापमानात वाढीमुळे उकाड्यात वाढ होणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.

यंदा फेबु्रवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासूनच तापमानात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. या तापमानवाढीत दिवसेेंदिवस वाढच होत असून, रविवारी पणजी येथे कमाल तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा 4.6 अंशाने जास्त म्हणजेच 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.4 अंश होते. मुरगाव येथे कमाल 33.6 अंश तापमानाची नोंद झाली. मुरगावात किमान तापमान 23.6 अंश होते. राज्यात विजेचे भारनियमन होत असताना, ही तापमानवाढ होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

Back to top button