गोव्यात कन्नड भवनसाठी दोन एकर जागा द्या | पुढारी

गोव्यात कन्नड भवनसाठी दोन एकर जागा द्या

पणजी : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून गोव्यात कन्नड भवन बांधण्यासाठी किमान 1 ते 2 एकर सरकारी जमीन देण्याची विनंती केली आहे. कर्नाटक सरकारने कोकणी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत आणि मंगळुरू येथे कोकणी अकादमीच्या बांधकामासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. असेही या पत्रात बोम्मई यांनी म्हटले आहे.

आपले सरकार गोव्यात कन्नड भवन बांधण्यास उत्सुक आहे. त्यासाठी किमान 1 ते 2 एकर जमीन हवी. ती सरकारी जमीन असल्यास चांगले होईल, असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. बोम्मई यांनी अलीकडेच गोव्यात कन्नड भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपये जाहीर केले होते.

अखिल गोवा कन्नड महासंघाच्या प्रतिनिधींची 9 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे बोम्मई यांची भेट घेतली होती या प्रितिनिधीमंडळाचे नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भाजप गोवा प्रभारी सी.टी. रवी. यांनी केले होते. गोव्यात उत्तर कर्नाटकातील लोक स्थायिक झाले आहेत. अखिल गोवा कन्नड महासंघाचे मानद अध्यक्ष सिद्धन्ना मेटी आणि इतर पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना शेजारच्या राज्यात स्थायिक झालेल्या कन्नड भाषिकांच्या समस्या आणि समस्यांची माहिती दिली होती.

Back to top button