गोवा : भाजपच्या सहभागी कॅबिनेट मंत्र्याला सरकारमधून हाकला : गिरीश चोडणकर | पुढारी

गोवा : भाजपच्या सहभागी कॅबिनेट मंत्र्याला सरकारमधून हाकला : गिरीश चोडणकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील जमीन बळकावण्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एका कॅबिनेट मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी केली आहे. हा तपास नि:पक्षपणे व अधिकार्‍यांवर दबाव नसताना होण्यासाठी हकालपट्टी गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

चोडणकर यांनी या संदर्भात ट्विट करून सदर मंत्र्याचे नाव जाहीर न करता ही मागणी केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीररीत्या जमीन हडपल्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करणे, हे सरकारने उचललेले स्वागतार्ह पाऊल आहे. पूर्वी मी हा मुद्दा उपस्थित केला होता, असे सांगून एका विद्यमान मंत्र्यानेच प्रचंड जमीन बळकावली आहे. अशा स्थितीत एसआयटी कसा न्याय देईल. मुख्यमंत्री गंभीर असल्यास त्यांनी एसआयटीला मोकळा हात देण्यासाठी या मंत्र्याला मंत्रिमंडळातून अगोदर हाकलून दिले पाहिजे.

Back to top button