पणजी : तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

पणजी : तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  आगशी-गोवा वेल्हा बायपास रस्त्यावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला. न्यूवाडा वास्को येथील अरफान खान असे मृत पावलेल्या चालकाचे नाव आहे.

आगशी पोलिस याप्रकरणी पुढील तपासणी करत आहेत. महाराष्ट्रातून पयर्टकाना घेऊन आलेल्या एमएच 07 पी 8787 व गोव्यातील जीए 06 टी 6361 क्रमांकाच्या कारमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

अपघातातील तिसर्‍या पिकअप वाहनाचेही नुकसान झाले आहे. अपघाताची धडक एवढी भीषण होती की, वाहनांचा चक्‍काचूर झाला. अपघात झालेली सर्व वाहने रस्त्याच्या दुतर्फा होती, त्यामुळे नक्‍की कोणत्या वाहनाने रस्ता ओलांडला हे स्पष्ट होत नव्हते. अपघातानंतर पोलिस आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button