आग्वाद-सिकेरी; पुढारी वृत्तसेवा: आग्वाद-सिकेरी येथे शुक्रवारी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. पाऊस आणि खवळलेल्या समुद्र अशा स्थितीत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि केरळ येथून सहलीसाठी आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी समुद्रात पडला आणि त्यात तो बुडाला.
खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे त्याचा शोध घेण्यास गेलेल्या पथकाला अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
हेही वाचलंत का?