Kaju Masala : बनवा ‘ढाबा स्टाईल काजू मसाला, एकदा करून पाहा | पुढारी

Kaju Masala : बनवा 'ढाबा स्टाईल काजू मसाला, एकदा करून पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरी आपण स्वत: बनवलेले जेवण खाऊन कंटाळतो. मग, हॉटेल किंवा ढाब्याकडे पाय वळतात. अनेकांना ढाब्यावर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला आवडते. (Kaju Masala) अशीच चव तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांमधून मिळाली तर? चला तर मग ढाबा स्टाईल ‘काजू मसाला’ बनवा. घरच्या घरी ‘काजू मसाला’ टेस्टी पदार्थ करून सर्वांना खाऊ घाला. (Kaju Masala)

साहित्य-

काजू

कांदे -२

लवंग -४ पावडर

वेलदोडे-३ पावडर

काळा वेलदोडा -१ पावडर

काळी मिरी – ४-५ पावडर

तूप – ४ चमचे

जिरा -१ चमचा पावडर

दालचिनी -मध्य आकाराचा तुकडा १

तमालपत्र – एक मोठे/ छोटे -२ पाने

चिरलेला कांदा -२

आले-लसुण पेस्ट -१ चमचा

कांदा चिरलेला टोमॅटो- २

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

हळद – १ चमचा

काजू भाजलेले

जिरा (भाजलेली) – १ चमचा

लाल तिखट – १ चमचा

क्रिम

मध – १ किंवा २ चमचा

कृती –

प्रथम २ कांदे मोठे मोठे चिरून घ्या. एका भांड्यात पाणी तापवून त्यामध्ये काजू आणि चिरलेला कांदा उकळ काढून घ्या. काजू-कांदा थंड झाला की, मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्या. आता एका मोठ्या कढईमध्ये तूप घाला.

त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलू-लसुण पेस्ट घालून मंद आचेवर परतून घ्यावे. त्यामध्ये जिरा, लवंग पावडर, वेलदोडे पावडर, दालचिनी, मिरी पावडर, तमालपत्र घालून ढवळून घ्यावे. नंतर काजू-कांद्याचे वाटण तुपात टाका.

वरून चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालावे. आता सर्व ग्रेव्ही शिजत ठेवावी. ग्रेव्ही शिजत आली की, त्यामध्ये भाजलेले काजू घालावे. वरून फ्रेश क्रीम घालावी. ग्रेव्ही आणि फ्रेश क्रीम एकजीव करून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

एक उकळ आली की, गॅस बंद करून कढई खाली उतरवून घ्या. वरून एक चमचा मध घाला. किंवा तुम्हाला गोड आवडत नसेल तर मध नाही घातले तरी चालेल. अशा प्रकारे तयार झाला गरमा गरम ‘काजू मसाला.’ या ग्रेव्हीसोबत पराठा किंवा चपाती खाऊ शकता.

Back to top button