फेसबुक टूल रोखणार आत्महत्या | पुढारी | पुढारी

फेसबुक टूल रोखणार आत्महत्या | पुढारी

दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सोशल मिडियाचा वाढता वापर, नैराश्य आणि युजर्सच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आता फेसबुक प्रयत्न करणार आहे. फेसबुकवर पोस्ट करुन आत्महत्या केल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा आत्महत्या रोखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर फेसबुक करणार आहे.

आत्महत्या करणाऱ्या युजरला वाचवता यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फेसबुकने सांगितले. जर युजर्सने आत्महत्येची पोस्ट किंवा लाईव्ह व्हिडिओ केल्यास त्याचे नोटीफिकेशन मित्रयादीत असलेल्यांना येईल. यामुळे त्या युजरला वाचवण्यासाठी , आ.त्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करता येतील. आत्महत्येबाबतच्या पोस्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापरामुळे मदत होणार आहे.

यापूर्वीच फेसबुकने अमेरिकेत सुसाईड प्रीव्हेन्शन टूलची चाचणी घेतली होती. सध्या काही देशांमध्ये हे टूल अपडेट करण्यात आले आहे.

Back to top button