First Botanist Women: ‘ती’च्या पाऊलखुणा : जानकी अम्मल भारतातील पहिल्या महिला वनस्पतीशास्त्रज्ञ | पुढारी

First Botanist Women: ‘ती’च्या पाऊलखुणा : जानकी अम्मल भारतातील पहिल्या महिला वनस्पतीशास्त्रज्ञ

जानकी अम्मल (4 नोव्हेंबर 1897 - 4 फेब्रुवारी 1984)

मुली शक्यतो कला शाखेचे अभ्यासक्रम निवडत. अशा काळात आपल्या वडिलांकडून निसर्गप्रेमाचे आणि निसर्गाच्या अभ्यासाचे धडे गिरवणार्‍या आणि त्यातच करिअर करणार्‍या जानकी अम्मल एदावलेथ कक्कत यांचा जन्म तेल्लीचरी या केरळमधल्या गावी झाला. जानकी यांना विज्ञान शाखेत खास रूची होती. त्यांनी हिमतीने वेगळी वाट चोखळली. त्या काळातील अत्युच्य शिक्षण घेऊन भारतातील पहिल्या महिला वनस्पतीशास्त्रज्ञ होण्याचा मान त्यांनी मिळवला. (First Botanist Women)

पंडित मदन मोहन मालविय यांच्या प्रेरणेने कोईमतूरमधे सुरू झालेल्या साखर संशोधन केंद्रात जानकी प्रमुख जनुकशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. गोड जातीच्या उसाच्या वाणाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी बनवलेलं वाण जास्त गोड आणि त्या काळी जवळपास दुप्पट उत्पादन देणारं होतं. शेतकर्‍यांना ते खूपच फायदेशीर ठरलं, उसाचं उत्पादन वाढलं. विशेष म्हणजे या संस्थेत काम करणार्‍या जानकी या तेव्हा एकमेव महिला होत्या. (First Botanist Women)

पुढे भारत सरकारने त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या पदावर नियुक्त केलं. त्यांनी लखनौ आणि जम्मू येथील सुप्रसिद्ध बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली. भारतातील विविध भागांतील वनस्पतींचे नकाशे तयार केले. त्यानंतर अलाहाबादच्या सेंट्रल बॉटनिकल गार्डनची धुरा त्यांनी सांभाळली. केरळमधील डोंगरमाथ्यावरील विविध वनस्पतींचा त्यांनी अभ्यास आणि संग्रह केला. आपल्या आवडीला आणि हिमतीला विज्ञाननिष्ठ अभ्यासाची जोड देऊन वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्‍या भारतीय महिलांमध्ये त्यांनी मानाचं स्थान मिळवलं. (First Botanist Women)

हेही वाचा:

Back to top button