Hair setting : पर्मनंट हेअर सेटिंगसाठी… | पुढारी

Hair setting : पर्मनंट हेअर सेटिंगसाठी...

अलीकडील काळात पर्मनंट हेअर सेटिंग (Hair setting) करण्यचा ट्रेंड रूढ होत आहे. हेअर स्टाईलमुळे स्त्रीच्या सौंदर्याला अधिक उठाव मिळतो. त्यामुळे केसाला स्टायलिश आणि फॅशनेबल लूक देण्यासाठी कायमस्वरूपी केसांची रचना बदलता येते. हल्ली या पर्यायाला पसंती दिली जाते.

प्रत्येक महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असते. एकूण सौंदर्यात केसांची भूमिका महत्त्वाची असते. हेअर स्टाईलमुळे (Hair setting) एक वेगळाच लूक येतो. त्यामुळे केसांना स्टायलिश आणि फॅशनेबल लूक द्यायचा असेल, तर कायमस्वरूपी बदल करून घेणे उत्तम पर्याय आहे. हल्ली पर्मनंट सेटिंग्ज करून घेण्याचा ट्रेंड वाढतोय.

ड्रायर, रोलर आणि जेल यांचा वापर करून केसाला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळतो. अर्थात हे करण्यासाठी वेळ लागतो. त्याशिवाय ड्रायर, रोलर यांच्या सतत वापराने केस खराबही होतात.

दीर्घकाळ केस एकसारखेच ठेवण्यासाठी कायमस्वरूपी सेटिंग्ज (Hair setting) करणे योग्य असते. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुरक्षितही आहे.

पर्मनंट सेटिंग्ज म्हणजे काय?

केस एकाच स्टाईलमध्ये दीर्घकाळ ठेवण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला पर्मनंट सेटिंग्ज (Hair setting) म्हणतात. कायमस्वरूपी बदल करताना कुरळ्या केसाचे सरळ केसात, तर सरळ केसाला कुरळ्या केसात परावर्तित करू शकतो. याचा अर्थ काही काळासाठी केस हव्या त्या आकारात ठेवून नवा लूक मिळवू शकतो.

प्रक्रिया कशी असते?

कायमस्वरूपी आकार बदलताना (Hair setting) केसाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
केस शॅम्पूने धुतल्यानंतर तेल लावले पाहिजे. त्यानंतर रासायनिक शॅम्पूने केस धुऊन मग केसाचा आकार बदलला जातो.
केस कुरळे असतील, तर ड्रायर वापरावा; जेणेकरून केस सरळ होतील.
केसाला लोशन लावून 3-4 मिनिटे तसेच ठेवले जाते. शॅम्पूने केस धुतल्यानंतर केसाला नरिशिंग ट्रिटमेंट दिली जाते.
पुन्हा केस प्रेस करून त्यावर रासायनिक लोशन लावले जाते. सर्वात शेवटी केस पुन्हा शॅम्पूने धुऊन ते प्रेस केले जातात.

कायमस्वरूपी सेटिंग करण्यापूर्वी

केसावर कायमस्वरूपी बदल करण्याचा (Hair setting) विचार करत असाल, तर त्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केस चांगल्या प्रकारच्या शॅम्पूने धुवावेत.
केस गळणे, कोंडा आणि टक्कल पडणे अशा तक्रारी असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
कायमस्वरूपी बदल करून घेताना तज्ज्ञांना आपल्या केसाविषयी सर्व माहिती जरूर सांगावी.

कायमस्वरूपी बदल केल्यानंतर

कायमस्वरूपी बदल करून (Hair setting) घेताना ज्या व्यक्तीला त्याविषयी संपूर्ण माहिती असेल अशाच प्रशिक्षित व्यक्तीकडून माहिती घ्यावी.
केसासाठी वापरली जाणारी काही उत्पादने चांगल्या गुणवत्तेची आणि दर्जाची असली पाहिजेत.
चांगल्या सेंटरमधून हेअर सेटिंग किंवा बदल करून घ्या. पैशांवरून कोणत्याही प्रकारचा समझोता करू नका; अन्यथा पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात केस खराब होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी सांगितलेले शॅम्पू आणि कंडिशनरचाच वापर करावा. सेटिंग केसाला नियमित तेल लावावे आणि दर पंधरा दिवसांनी एकदा हेअर स्पा करावा.

Back to top button