कस्तुरी क्‍लबच्या केक, चॉकलेट वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

कस्तुरी क्‍लबच्या केक, चॉकलेट वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

इस्लामपूर : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद महिलांसाठी झालेल्या केक, चॉकलेट वर्कशॉपला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आईस केक व चॉकलेट बनविण्याचे प्रात्यक्षिक महिलांना जवळून पहायला व शिकायला मिळाल्याने महिलांनी कस्तुरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. 

येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयाच्या हॉलमध्ये झालेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 200 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कस्तुरीच्या सभासद तसेच इतर महिलाही सहभागी झाल्या होत्या. कस्तुरीचे उपक्रम पाहून महिलांनी उत्स्फूर्तपणे सभासद नोंदणी केली. या कार्यक्रमातच सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

संबंधित बातम्या

नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर कस्तुरी क्‍लबने राबविलेला आईस केक व चॉकलेट बनविण्याचा उपक्रम चांगला असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. येथील ड्रीम्स क्‍लासेसच्या संचालिका तेजस्विनी शहा यांनी महिलांना केक व चॉकलेटचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मायक्रो वेव्हशिवाय गॅसवर घरच्या घरी केक बनवायला शिकविण्यात आले. 

ड्रायफूडस् चॉकलेट, विना ओव्हन आईस केक, व्हीप क्रीम मेकिंग, कप केक, मफीन्स, डॉल केक तसेच चॉकलेटमध्ये ख्रिसमस कॅडबरी, सांताक्‍लॉझ चॉकलेटस्, बटर स्कॉच, चोकोज् डेअरी मिल्क आदी प्रकार शिकविण्यात आले. ज्या सभासद महिलांचे या महिन्यात वाढदिवस होते त्यांचे वाढदिवस तयार केलेला केक कापून सर्व महिलांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले. 

या महिन्यातच पार्लर वर्कशॉपचे आयोजन केले आहे. महिलांनी सभासद नोंदणी करून कस्तुरीची नाव नोंदणी पक्की करावी, असे आवाहन कस्तुरी क्‍लबच्यावतीने केले आहे. झालेल्या वर्कशॉपमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपप्राचार्या राजश्री पाटील होत्या. यावेळी कस्तुरी क्‍लबच्या वेलफेअर कमिटी सदस्या अ‍ॅड. शैलजा पाटील, प्रिया पाटील उपस्थित होत्या. 

कस्तुरी क्‍लबच्या को-ऑर्डीनेटर मंगल देसावळे यांनी दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या उपक्रमांची तसेच वर्षभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांची माहिती, वेलफेअर कमिटी सदस्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी कस्तुरीच्या कमिटी मेंबर सारिका जाधव, प्रियांका पाटील, मेघना पाटील, राधिका चौगुले, सोनाली शिंदे, सरिता माने, मृणाल चौगुले, संगीता पाटील, स्वाती पवार, रूपाली जाधव, सुजाता पाटील आदींनी संयोजन केले. सभासद नोंदणीसाठी दै. पुढारी इस्लामपूर कार्यालय(02342) 222333, मोबा : 8830604322 यावर संपर्क साधावा.

Back to top button