फॅशन-पॅशन : वेस्टकोट कसा घालाल? | पुढारी

फॅशन-पॅशन : वेस्टकोट कसा घालाल?

सभ्यपणा आणि वैविध्याने परिपूर्ण असलेला, फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगी घालता येणारा वस्त्रप्रकार म्हणजे वेस्टकोट. वेस्टकोट घालताना काही मूलभूत नियमांचे पालन करावे लागते. त्यापैकी पहिला नियम म्हणजे, योग्य फिटिंग होय. वेस्टकोटची फिटिंग अत्यंत महत्त्वाची असते. त्याचे आर्महोल्स हाय असावेत आणि शोल्डर्सला योग्य फिट होणारा असावा. पोटाकडच्या भागालासुद्धा तो व्यवस्थित फिट होणारा असावा, तरंगणारा नसावा. यामध्ये फॅब्रिकचाही विचार अवश्य असावा. 

यापैकी कुठलीही गोष्ट नसली तर वेस्टकोट चांगला दिसत नाही. वेस्टकोटचा उद्देशच मुळी व्यक्ती फिट आणि नेटकी दिसावी असा असतो. लग्न समारंभाच्या वेळी वेस्टकोट घालणार असाल तर वेस्टकोटचे खालचे बटन लावू नये. त्यामुळे हात वर केल्यानंतर वेस्टकोट वर ओढला जाणार नाही. वेस्टकोटची निवड करताना सिझनचा विचार अवश्य केला पाहिजे. ट्विड किंवा कॉर्ड्युरॉय हे मटेरिअल हिवाळ्यासाठी निवडावे. कॉटन आणि व्हिपकॉर्ड उन्हाळ्यासाठी निवडावे. शायनी पॉलिस्टर मटेरिअल घेणे टाळावे. कारण प्रकाशात ते विचित्र दिसते. यामध्ये दोन गरज नसलेल्या गोष्टी टाळाव्यात. त्यापैकी एक म्हणजे फॅन्सी लायनिंग आणि दुसरे भडक पॉकेटस्. शिवाय वेस्टकोट हा कुठल्याही साध्याशा पॅन्टवर घालू नये. अन्यथा ते वेटरसारखे दिसेल. सूट किंवा ब्लेझरच्या रंगाच्या विरुद्ध रंगाच्या वेस्टकोट घालण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ग्रे किंवा ब्राऊन, ट्विडी आणि त्यासोबत नेव्ही फ्लॅनेल सूट असा पेहराव हिवाळ्यामध्ये करता येऊ शकतो. एखादा स्ट्राईपचा शर्ट त्यावरून घालता येईल आणि ग्रे टाय घालावा.

संबंधित बातम्या
Back to top button