प्रशिक्षण द्या; पैसे कमवा | पुढारी

प्रशिक्षण द्या; पैसे कमवा

जयदीप नार्वेकर

आज प्रत्येक स्तरावर मनुष्यबळाच्या विकासात्मक गरजांची पूर्तता करण्याची या विभागाची जबाबदारी असते. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नेमक्या कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे, हे जाणून घेणे आणि त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे मुख्य काम असते.

संबंधित बातम्या 

मोठ्या कंपन्यांमध्ये या विभागामार्फत प्रामुख्याने वस्तुनिष्ठ प्रशिक्षण कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते; तर शैक्षणिक संस्थांमध्ये या विभागाच्या कामाचे स्वरूप थोडे वेगळे असते. यामध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे समूह चर्चा, मौखिक सादरीकरण म्हणजेच ओरल प्रेझेंटेशन आणि मुलाखत या गोष्टींचा विकास करण्यासाठी पूरक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या संस्थेत, कंपनीत नोकरी मिळावी म्हणून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे, मदत करणे, त्यांच्यातील क्षमता वाढवणे तसेच एजंट म्हणून काम करणे, अशी बरीच मोठी व्याप्ती यांच्या कामाची असते.

शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपल्या बायोडेटाचा आराखडा तयार करणे, सामूहिक चर्चेत सहभागी होणे, मुलाखतीची तयारी करून घेणे, कॉर्पोरेट क्षेत्रात वापरताना अचूक निर्णय कसे घ्यावे, भरती प्रक्रियेतील तीव्र स्पर्धेला कसे तोंड द्यावे यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

कॉर्पोरेट क्षेत्रात तांत्रिक आणि वागणुकीसंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे कर्मचार्‍यांची मानसिकता वाढते. परिणामी, उत्पादन व कार्यक्षमताही वाढते.

पात्रता ः प्रशिक्षण आणि मार्गदर्शक क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे मनुष्यबळ व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे; पण इतर विषयातील पदवीधारकांनाही या क्षेत्रात संधी आहेत; मात्र या क्षेत्रात कार्य करण्याचा व्यापक अनुभव आवश्यक असतो. मनुष्यबळ व्यवस्थापनाचा पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम देशभरातील बर्‍याच संस्थांमध्ये राबवला जातो. शैक्षणिक पात्रतेबरोबरच या क्षेत्रात करिअर करणार्‍यांकडे काही अंगभूत गुणही आवश्यक असतात.

उदाहरणार्थ, या उमेदवारांकडे बोलण्याची कला हवी. व्यक्तींमधील गुणवत्ता व क्षमता ओळखण्याची दृष्टी हवी. तसेच जनसंपर्क, स्वतःला सतत नव्या बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता, काळानुसार उद्योग क्षेत्रातील बदलत्या मागण्यांची समज यांसारख्या गोष्टी असणे गरजेचे आहे.

Back to top button