परीक्षेची रणनीती तयार करताना… | पुढारी | पुढारी

परीक्षेची रणनीती तयार करताना... | पुढारी

जान्हवी शिरोडकर

परीक्षेच्या काळात काहींच्या घरात संचारबंदीसद‍ृष्य वातावरण असते. टी.व्ही. लावला जात नाही, घरातील सर्व मंडळी गंभीर वातावरणात असतात. परंतु, अशा स्थितीत मुलांवर नकळतपणे दडपण वाढत जाते. घरात जास्तीत जास्त अनौपचारिक वातावरण कसे राहील याचाच प्रयत्न करायला हवा.

परीक्षेची चांगली तयारी केली नाही तर आपण चांगल्या गुणांपासून वंचित राहू शकतो. आजकाल परीक्षेचे प्रमाण वाढलेले असताना विद्यार्थ्यांना नेहमीच तयारीत राहवे लागते. एरव्ही क्लासमध्ये देखील सरप्राईज टेस्ट घेतली जाते. अशावेळी तयारीअभावी मुले गडबडून जातात. जी मुले नियमित अभ्यास करतात, त्यांना अशा परीक्षेची भीती वाटत नाही. फार थोडी मुलं अशी असतात की ती आत्मविश्‍वासपूर्वक परीक्षेला सामोरे जातात. काही जण तर परीक्षेच्या भीतीपोटी किंवा दडपणापोटी केलेला अभ्यास विसरतात. कितीदाही वाचन केले तरी लक्षात राहत नाही, अशी पालकांकडे तक्रार करतात. मुळात तयारीला दिलेला वेळ आणि समजून केलेला अभ्यास हे महत्त्वाचे आहे. वार्षिक किंवा सहामाही तसेच प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक आपल्याकडे असल्याने त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करतो.

संबंधित बातम्या

तरीही नियोजनात काही उणिवा राहिल्या तर तयारी असूनही आपण गुणात उणे ठरतो. अभ्यासाची वारंवार उजळणी करणे, प्रश्‍नोत्तरे लिहण्याचा सराव करणे, अवांतर वाचनातून अभ्यासाची माहिती घेणे यासारख्या गोष्टीतून आपण परीक्षेची तयारी करू शकतो. परीक्षेच्या काळात काहींच्या घरात संचारबंदीसद‍ृष्य वातावरण असते. अशा स्थितीत मुलांवर नकळतपणे दडपण वाढत जाते. घरात जास्तीत जास्त अनौपचारिक वातावरण कसे राहील याचाच प्रयत्न करायला हवा. प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळातील रणनीती वेगवेगळी असते. त्याची आपल्याला सळमिसळ करता येत नाही.

अभियांत्रिकी, वैद्यकिय, कायदा या अभ्यासक्रमाचे धोरण आणि रणनीती वेगळी असते. त्यानुसार विद्यार्थी अध्ययन करत असतो. काहींचा प्रॅक्टिकलवर भर असतो तर काहींचा थेअरीवर भर असतो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना लिखाण तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाऊंटचा सराव लागतो. परीक्षेपूर्वी आखलेल्या रणनीतीचा निश्‍चितच फायदा पेपर सोडवताना होतो. 

अवकाशशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी : अशा शास्त्राच्या विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता भरपूर असते. यासाठी ते सातत्याने निरीक्षण नोंदवत असतात. अवकाशात किंवा शास्त्रात आढळणार्‍या बाबींची नोंद करतात आणि त्याचे अध्ययन करतात. त्यांना एखाद्या वस्तूंचे किंवा घटकांचे चित्र काढणे कठीण जात नाही. कारण त्यांनी डोळ्यांनी अनुभवलेले असते. एखादी संकल्पना मांडण्यास सांगितले तर ते तत्काळ कागदावर संकल्पना उतरवतात आणि त्याचे विश्‍लेषण करतात. परीक्षेच्या काळात संकल्पनांचा अभ्यास करताना तो प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रंगाचा वापर करा. जर तुम्ही अधिकाधिक साहित्याचा वापर केला तर अभ्यास आकलन लवकर होईल. 

संगीतशास्त्रांच्या विद्यार्थ्यांसाठी : परीक्षेच्या काळात पालकवर्ग घरातील मनोरंजनावर फुली मारतात. गाणे ऐकू देत नाहीत, टीव्ही पाहू देत नाहीत, खेळायला मनाई करतात, सायकलवरही फेरी मारू देत नाहीत. 

अशा स्थितीत प्रत्येक मिनिटाला पाल्याने अभ्यास करावा, अशी अपेक्षा पालकमंडळी करत असतात. परंतु, ही कडक शिस्त सर्वच विद्यार्थ्यांना पचनी पडेल असे नाही. काही विद्यार्थ्यांची आकलनशक्‍ती चांगली असते आणि त्यांना एका वाचनात अभ्यास लक्षात राहतो. संगीत अभ्यासक्रमाला असणार्‍या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानातून संगीत शिकण्यापेक्षा ते अनुभवण्याचा प्रयत्न करावा. राग ठुमरीचे वाचन करण्यापेक्षा त्याचे श्रवण केल्यास तो राग समजण्यास अधिक सुलभ जाते. तणावातून मुक्‍ती मिळण्यासाठी संगीत माध्यम साह्यभूत ठरते. याची प्रचिती अनेकांना आली आहे. संगीतविश्‍वातील मातब्बर कलाकारांच्या मुलाखती ऐकणे, वाचने यामाध्यमातूनही अभ्यासाची कक्षा रुंदावता येते. 
शास्त्रीय विद्यार्थ्यांसाठी रणनीती : शास्त्रांच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि थेअरी यांचा मेळ साधावा लागतो. 

शास्त्रातील किचकट संकल्पनांबरोबरच गणितातील कठीण तार्किक प्रश्‍नांचीही सोडवणूक करावी लागते. अभ्यासातील तार्किक प्रश्‍नांची उत्तरे ही चित्रांच्या आधारे,  ग्राफच्या आधारे स्पष्ट केले तर परीक्षेसाठी फायदेशीर ठरू शकतात. काही वेळेस शास्त्राचा अभ्यास करणारी मुले एकाच मुद्द्यावर अडून राहतात. 

परिणामी पुढील प्रश्‍न सोडवतानाही तोच विचार घोळत राहतो. त्यामुळे ही स्थिती टाळण्यासाठी केवळ वाचनावर भर देण्यापेक्षा संकल्पना मांडून अभ्यास केला तर तो अधिक सोयीचा आणि लक्षात राहण्यास हातभार लावू शकतो. 

Back to top button