भरघोस वेतन देणारे ‘करिअर’ पर्याय | पुढारी

भरघोस वेतन देणारे ‘करिअर’ पर्याय

मॅनेजमेंट प्रोफेशन : अनेक प्रकारच्या बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटची पदवी घेतली जाते. मात्र आयआयएम, आयआयटी, एक्सएलआरआय, एफएमएस, आयआयएफटी आणि सिम्बॉसिससारख्या प्रमुख संस्थेत शिकणार्‍या युवकांना चांगले वेतन मिळते. त्याचबरोबर याठिकाणी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना देखील चांगली नोकरी आणि चांगले करिअर होण्याचा मार्ग मोकळा होतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा ते एक वर्षांपर्यंत प्रशिक्षण घ्यावे लागते. सुरुवातीला वार्षिक पॅकेज वीस ते 24 लाखांपर्यंत मिळते. बहुतांश विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूहमधून निवड होते. 

इन्व्हेस्टमेंट बँकर्स : एक इन्व्हेस्टर बँकरचे करिअर सर्वसाधारणपणे अ‍ॅनालिस्ट, असोसिएट, उपाध्यक्ष, डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टरसह पाच स्टँडर्ड पोझिशन मिळवतात. अ‍ॅनालिस्टसाठी वार्षिक पाच ते 9 लाख, असोसिएटसाठी 7-13 लाख, व्हाइस प्रेसिडेंटसाठी 10-40 लाख रुपये वार्षिक वेतनमान दिले जाते. आजकाल इन्व्हेस्टमेंट बँकरची मागणी वेगाने वाढत चालली आहे. यासाठी आपल्याजवळ चांगली पदवी असणे देखील महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील बँका अशा प्रकारची सॅलरी देताना दिसून येतात. सिंगापूर बँक, यस बँक, डॉइच यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

आयटी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर : प्रशिक्षणार्थी इंजिनिअरला  मोठ्या  कंपनीत सुरुवातीला दीड ते साडेतीन लाखांचे पॅकेज मिळते. जसजसा अनुभव वाढत जाईल, तसतसे पॅकेज वाढत जाते. सिनिअर इंजिनिअरला साडेचार ते दहा लाखांपर्यतचे पॅकेज असते. तसेच प्रोग्रॅम मॅनेजरला सहा ते तेरा लाखांपर्यंत पॅकेज असते. या मंडळींना चांगल्या वेतनाबरोबर अन्य देशातही कंपनीच्या नव्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळते. 

चार्टर्ड अकाऊंट्स : भारतात सीएची नोकरीसाठी चांगली सॅलरी मिळते. नवीन सीए हा वार्षिक पाच ते सात लाख वार्षिक पॅकेज मिळवू शकतो. जसजसा अनुभव वाढेल आणि त्याचबरोबर एमबीएची पदवी प्राप्त केली तर त्याची सॅलरी 18 ते 24 लाखांपर्यंत जाते. 

तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र : प्राथमिक पातळीवरच्या कर्मचार्‍याला सुरुवातीला या क्षेत्रात साडेतीन ते सहा लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळते. भारतात पीएसयूसारखे ओएनजीसी, आयओसीएल, भारत पेट्रोलियमसारख्या अनेक कंपन्या सुरक्षित जॉब प्रदान करतात. ब्रिटिश गॅस, रिलायन्स एनर्जी, शेल यासारख्या खासगी कंपन्या देखील अधिक सॅलरी देतात. पाच ते सहा वर्षांच्या अनुभवी व्यक्ती आणि उच्च पदवी घेणार्‍यास 15 ते 20 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळते. 

मेडिकल आणि फार्मा प्रोफेशनल्स : डॉक्टरची नोकरी ही सर्वाधिक फायद्याची मानली जाते. डॉक्टर खासगी व्यवसायही करू शकतात आणि सरकारी नोकरीही. सर्जन, मेडिसीन, स्पेशालिस्ट यासारख्या तज्ञांची सरकारला आणि मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये गरज असते. सुरुवातीला साडेचार ते सहा लाखांपर्यंत पॅकेज मिळते. त्यानंतर डॉक्टरच्या सॅलरीत वाढ होतच जाते. औषधी कंपन्यात देखील उच्चशिक्षित व्यावसायिकांची गरज असते आणि त्यातील वेतनही लाखोंच्या घरात आहे. 

एव्हिएशन प्रोफेशनल्स : अलिकडच्या काळात एअरलाइन्स क्षेत्रातही वाढ झाली आहे. पायलट, ग्राऊंड स्टॉपर, एअर होस्टेस आदींची मागणी वाढली आहे. जंबो पायलट आणि नियमित पायलटसाठी साधारणत: 7 ते 9 लाखांपर्यंतचे पॅकेज आहेत. एअर होस्टेसला देखील चार ते सहा लाखांपर्यतचे पॅकेज आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलरला पाच ते सहा लाखांपर्यतचे पॅकेज आहेत. 

मॉडेलिंग आणि अभिनय : पात्राच्या आधारावर नवीन व्यक्तीला प्रत्येक भागाच्या आधारावर वेतन दिले जाते. हे वेतन दोन हजार ते दहा हजारांपर्यंत असते. त्याचवेळी अनुभवी कलाकारांला टिव्हीसाठी दहा हजार ते दोन लाखांपर्यंतचे वेतन प्रत्येक भागासाठी दिले जाते. चित्रपट उद्योगात पहिल्यांदा काम करणार्‍या कलाकाराला चित्रपटाच्या बजेटनुसार 5 ते 50 लाख रुपये मिळू शकतो. नवीन मॉडेलला पाच ते दहा हजार रुपये एका जाहिरातीसाठी मिळू शकतात. प्रस्थापित मॉडेलला मात्र 25 हजार ते 50 हजार रुपये एका  जाहिरातीमागे मिळतात. तमिळ, हिंदी चित्रपट उद्योगातील यशस्वी कलाकारांचे पॅकेज कोट्यवधीच्या घरात आहेत.  

व्यावसायिक वकील : व्यावसायिक वकिलाला अनुभवानुसार आणि रेकॉर्डनुसार पैसे मिळतात. तसे पाहिले तर नवीन मंडळींना सहा ते 9 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळते. अनुभव वाढल्यास हे पॅकेज 15 लाखांपर्यंत पोचते. खटल्यांतील किचकटपणा आणि ग्राहकांची संख्या पाहून फीस ठरवली जाते. एजेडबी अँड पार्टनर्स, लूथरा अँड लूथरा, अमरचंद मंगलदास हे भारतातील प्रमुख कायदेशीर फर्म असून ते कॉर्पोरेट कायद्यात रस ठेवतात. ज्या मंडळींना बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करायचे आहे, ते करू शकतात आणि त्यांना चांगली सॅलरी देखील मिळते. चांगल्या वकिलाला देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे. 

व्यावसायिक सल्लागार : एक व्यावसायिक सल्लागार अनेक ठिकाणी काम करू शकतो. मग ते अर्थ क्षेत्र असा किंवा मीडिया हाऊस. त्याची मागणी प्रत्येक क्षेत्रात असते. बिझनेस कन्सल्टंट हा आपल्या मार्केटिंगच्या जोरावर पीआर वाढवतो. एक वर्षाचा अनुभव असणार्‍या मंडळींना चार ते सहा लाखांचे पॅकेज मिळते. ज्यांच्याकडे पाच ते सात वर्षांचा अनुभव आहे, त्यांना 12 ते 18 लाखांचे पॅकेज मिळते. ही मंडली सल्लागार, विश्‍लेषक, वरिष्ठ सल्लागार, व्यवस्थापक, संचालक या पदावर काम करतात. 

सत्यजित दुर्वेकर
 

Back to top button