पेटेन्टिंग: प्रेरणादायी  करिअरचा पर्याय | पुढारी | पुढारी

पेटेन्टिंग: प्रेरणादायी  करिअरचा पर्याय | पुढारी

“सध्या मानवी जीवनाच्या सर्वत्र क्षेत्रात या ना त्या स्वरूपात संशोधन प्रक्रिया” सातत्याने कार्यरत आहे. एखाद्या संशोधकाला त्याच्या संशोधनाचा मागणी हक्‍क परवाना (पेटेंट) कायदेशीररीत्या प्राप्‍त करणे अपरिहार्य ठरते. विशेषकरून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांतील संशोधकांना अशा पेटेन्टिंगमुळे स्वतःच्या संशोधनाचा उपयोग स्वतःच्या उन्‍नतीसाठी, प्रगतीसाठी करता येतो.

‘संशोधन’ हा सध्याच्या मानवी जीवनातील परवलीचा शब्द आहे. मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या ना त्या स्वरूपात संशोधन प्रक्रिया सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे एखाद्या संशोधकाला आपल्या संशोधनाच्या मालकी हक्‍क कायदेशीररीत्या प्राप्‍त करणे ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. मालकी हक्‍क अबाधित राखण्यासाठी संशोधकांकडून करण्यात येणार्‍या प्रक्रियेला पेटेन्टिंग (Pa

tenting) असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते.

• ‘पेटेंटस् म्हणजे काय ? 

‘पेटेन्टिंगचे सविस्तर स्पष्टीकरण करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, पेटेंट हा एक प्रकारचा परवाना (License) किंवा संशोधकाला त्या संशोधनाचा मालकी हक्‍क देणारा सरकारी दाखला असतो. एखाद्या प्रादेशिक सरकारने त्या प्रदेशातील संशोधकाला एका निश्‍चित कालावधीसाठी त्याच्या संशोधनाचा मालकी हक्‍क बहाल केलेला असतो. अशा संशोधकाने केलेल्या संशोधनाचा उपयोग किंवा वापर संशोधकाच्या परवानगीशिवाय आर्थिक किंवा इतर फायद्यांसाठी दुसर्‍या व्यक्‍तीने करणे बेकायदेशीर ठरते. अशा व्यक्‍तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. विशेष करून विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधकांना अशा पेटेन्टिंगमुळे स्वतःच्या संशोधनाचा उपयोग स्वतःच्या भावी उभारणीसाठी/प्रगतीसाठी करता येतो आणि त्याच्या इच्छेनुसार पुढची वाटचाल निर्धास्तपणे करता येते. संशोधनाचा कमर्शिअल वापर करून आर्थिक प्राप्‍ती करता येते. पुढे दिलेल्या आकृतीहून पेटेंटचे विविध उपयोग स्पष्ट होतात.

• पेटेंटस्चे फायदे

विक्रीसाठी वापर, संशोधनाचे संरक्षण सामाजिक किंवा इतर उद्दिष्टसाठी पेटेंट बहाल (Donate) करता येते. गैरवापर झाल्यास कयदशीर कारवार्ई करता येते. पेटेंटचा कायदेशीर परवाना

•  पेटेन्टिंग क्षेत्राचा आवाका :

विज्ञान शाखेतील पदवीधरांना आकर्षित करणारे असे हे करिअर क्षेत्र आहे. विशेष करून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील उमेदवार ज्यांना विज्ञानाबरोबर तांत्रिक (technical) आणि कायदे ज्ञान (legal knowledge) या दोन घटकांचे विशेष ज्ञान आहे. आशा उमेदवारांना या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. पेटेन्टिंग क्षेत्रात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही पर्याय पुढे दिले आहेत.

• पेटेंट एक्झामिनर : या पदावर कार्यरत असणारी व्यक्‍ती पेटेंटकरिता आसलेल्या अर्जांची छाननी करते.

• इंडियन पेटेंट कार्यालयातील कंट्रोलर : पेटेंट अर्जावर पुढील कार्यवाहीसाठी करावयाची की नाही हे ठरविण्याचे अधिकार या पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्‍तीला असतात. 

• पेटेंट एजेंट : अशा एजेंटला भारतीय तसेच परकीय व्यक्‍ती संदर्भातील अर्जांची हाताळणी कंट्रोलरच्या मार्गदर्शनाखाली करावी लागते.

• पेटेंट अनॉलिस्ट : पेटेंटसाठी आलेल्या संशोधनाची सुक्ष्म तपासणी करून त्याची पेटेंट अ‍ॅबिलिटी, त्याचा खरे /खोटेपणा, विश्‍वासहर्ता इत्यादी गोष्टी ठरविण्याची जाबबदारी या पदावर काम करणार्‍या व्यक्‍तीकडे असेल.

• पेटेंट अ‍ॅटोर्नी : या व्यक्‍तीला कायदेकानून नियम तसेच बौधिक मालमत्ता (intellectual Property) संदर्भातील पार्श्‍वभूमी ज्ञात असते अपेक्षित असते. त्याचप्रमाणे पेटेंट मिळविण्यासाठी सर्व बाबतीत पेटेंट अर्जदाराला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अ‍ॅटॉर्नीवर असते. 

• पेटेंट सायंन्टिस्ट :  सायंटिफिक पेटेंट अ‍ॅप्लिकेशनचे स्मार्ट  मूल्यांकन करण्याची जबाबदारी पेटेंट वैज्ञानिकाकडे असते.

• पेटेंट इंजिनिअर : पेटेंट अर्जाची इंजिनिअरिंग संदर्भात बाबी तपासायचे  आणि त्याविषयाची त्याची मते नोंदविण्याचे काम या पदावरील व्यक्‍ती करते. याबरोबरच पेटेंट टेक्नॉलॉजिस्ट टेक्निकल स्पेशालिस्ट , पेटेंट मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट प्रोफेशन्स इत्यादी पदे देखील पेटेंट क्षेत्रात उपलब्ध असतात. 

• अपेक्षित कैशल्ये : या क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणार्‍या विज्ञान शाखेतील पदवीधारांकडे रिडिंग (Reading) स्किम, सूक्ष्म माहितीकडे पूर्णपणे लक्ष देण्याची क्षमता, निर्णय घेण्याची कुवत, संवाद कौशल्य, सायंटिफिक आणि टेक्निकल घटकांचे उत्तम ज्ञान जाण, विश्‍लेषात्मक (Analytical) कौशल्य, संघटनात्मक कौशल्य, कायदेशीर बाबींचे ज्ञान, नेटवर्क आणि लोकसंग्रह करण्याची सबब, इत्यादी कौशल्ये असणे आवश्यक ठरते.

• पेटेंट करिअर संधी बहाल करणार्‍या संस्था/संघटना : पेटेंट क्षेत्रातील करिअर्स बाहल करणार्‍या संस्था/ संघटनामध्ये खासगी संस्था, सरकारी विभाग, दिग्गज काँफर्स, महत्त्वाच्या औद्योगिक आणि संशोधन संस्था शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था इत्यादी संस्थांचा समावेश होतो. 

पे पॅकेज : या क्षेत्रात करिअर करणार्‍या उमेदवाराला त्याच्या पात्रतेनुसार 4 लाख ते 18 लाख रुपये इतके वार्षिक पगार पॅकेज मिळू शकते.

• पेटेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण देणार्‍या संस्था :

पेटेंटसारख्या बौद्धिक मालमत्ता (intellectual Property)  क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे आयपी म्हणजे इंटेक्‍चर प्रॉपर्टी संदर्भात सर्टिफिकेट तसेच पदवी कोर्सेस दूर शिक्षण (Distnce eduction) पद्धतीने बाहल करणार्‍या अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत. अशा संस्थांमध्ये प्रामुख्याने वर्ल्ड इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायजेशन (world Intellectual property organization – WIPO) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज (FICCT) इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन ऑफ इंफॉरमेशन रिसोर्र्स (NISCAIR), इ. या संस्थांचा समावेश होतो.

सर्वच संशोधकांना आपल्या संशोधनाचे पेटेंट करून द्यावयाचे असते. सध्या सर्वच क्षेत्रांत आणि विशेष करून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आणि विशेषकरून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर संधींचा सुकाळ सुरू आहे. त्याचबरोबर 2016 ची इंडियन नॅशनल आयपीआर (IPR) पॉलिशी या व्यवसायाला/क्षेत्राला अतिशय पोषक ठरलेली आहे. या पोलिशीनुसार देशभरात संशोधनात्मक आणि औद्योगिक सेंटर्स उघडली आहेत. विद्यापीठ अनुदानप मंडळ (यूजीसी) या संस्थेने देखील या पॉलिशीला पाठबळ देण्याकरिता विद्यापीठांनी आपल्या क्षेत्रात टूनोव्हेशन लॅब्स आणि इन्टेलेक्‍चुअल प्रापर्टी सेंटर्स सुरू करण्यासाठी फतवा काढला आहे. या सर्व उपलब्ध घटकांचा फायदा घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची पार्श्‍वभूमी असणार्‍या उमेदवारांनाच या क्षेत्रात करिअर करण्याचे आव्हानाला सामोरे जायला हवे.

Back to top button