स्मार्टफोन अ‍ॅप बनवा, करिअर चमकवा | पुढारी

स्मार्टफोन अ‍ॅप बनवा, करिअर चमकवा

उमेश कोळी 

मोबाईल फोनच्या शोधाने मानवी जीवनाचा कायापालट झाला आहे. संवाद प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच जीवनातील अडचणी दूर करण्याचे कामही स्मार्टफोनने केले आहे. 

एकंदरितच स्मार्टफोनमध्ये कार्यरत अ‍ॅप्समुळे आपल्या फोनमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. म्हणूनच  काही वर्षांपासून मोबाईल अ‍ॅप डेव्हलपमेंट क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात आपण स्वत: तयार होत असताना आपल्या करिअरचाही विस्तार करू शकतो. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी देश-विदेशात संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नोकरी करण्यापासून उद्योग करण्यापर्यंतच्या संधीचा यात समावेश आहे. वास्तविक, या क्षेत्रात करिअर करण्यासाठी निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. 

संधी आणि कार्य : एखादा अ‍ॅप डेव्हलपर हा मोबाइल युआय डिझायनर, यूजर एक्सिपिरियंन्स आणि यूजेबिलिटी एक्स्पर्ट, अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर किंवा इंजिनिअर आदी तीन प्रमुख भूमिका साकारात असतो. सोशल मीडियासह स्मार्टफोन यूजरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत या क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. विविध सर्व्हिस प्रोवायडर आणि ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या अ‍ॅप्सचे लूक्स आणि रचनेशिवाय अ‍ॅप अधिक सुरक्षित आणि अपडेट करण्याचे काम करावे लागते. यासाठी कंपन्या कुशल तज्ज्ञांची भरती करत असतात. आपणही कोणत्याही अ‍ॅप डेव्हलपर कंपनीशी जोडण्याबरोबरच वैयक्तिक पातळीवर अ‍ॅपची रचना करून त्यास यूजरसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. विविध ओएस आणि लँग्वेज शिकण्याबरोबरच आपल्याला नियमित अंतराने सर्टिफिकेट, डिप्लोमा यासारखे शॉर्ट टर्म अभ्यासक्रम शिकावे लागतील. त्याचबरोबर मार्केटमध्ये असणारे अ‍ॅप्स आणि त्यांच्या फिचरबाबत स्वत:ला अपडेट रहावे लागेल. अन्यथा, आपला अ‍ॅप कालबाह्य होऊ शकतो. 

संस्था :

• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास.

• अपेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिमीडिया, कोइमतूर.

• अँड्राइड इन्स्टिट्यूट, कोलकता.

• आयएसएम यूनिव्हर्सिटी, बंगळूर.

 सी-डॅक, पुणे.

Back to top button