ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान? | पुढारी

ऑनलाईन शिक्षण शाप की वरदान?

वाशी (नवी मुंबई)

कोरोना आणि टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोना नंतरच्या काळात शाळा कशा असतील याची चर्चा आता विविध व्यासपीठावर होत आहे, त्यात प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीला एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विकासाचे पुढचे पाऊल टाकले जाणार असून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ज्ञानाचे भांडार उघडले जाणार आहे त्यामुळे सर्वांना समान शिक्षण मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. डिजिटल शिक्षण ही अडचणीच्या काळात अपरिहार्यता म्हणून स्वीकारलेली पध्दत असून हा कायमस्वरूपी इलाज असू शकत नाही. ऑनलाईन शिक्षणाचे जसे फायदे आहेत तसे तोटे ही आहेत.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामुळे कॉम्पुटर, लॅपटॉप, पॅड, टॅबलेट, स्मार्टफोन, इंटरनेट इत्यादी हाताळण्याचे ज्ञान आले असून त्याचा वापर ते आपल्या वैयक्तिक जीवनात ही करू लागले आहेत. ऑनलाईनमुळे पालक आणि मुले अगोदर काही तास सोबत असत पण आता २४ तास सोबत आहेत. डिजिटल शिक्षणामुळे मुले एकलकोंडी होत आहे ,कारण ती एकटीच घरी राहून शिक्षण घेत आहेत. 

ऑनलाईन शिक्षणाची सर्वात मोठी अडचण म्हणजे इंटरनेटची उपलब्धता. कारण सर्वच भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल असे नाही. सर्वच पालकांकडे स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप असेल असे नाही कारण प्रत्येक शाळेत सर्व स्तरातील मूले येतात. हातावर पॉट असणाऱ्याची सुद्धा मुले आहेत त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण शक्य होईलच असे नाही. ऑनलाईन शिक्षण देतांना शिक्षकांना ही बरीच मेहनत घ्यावी लागते ppt बनविणे, विषयांवर संदर्भ मिळवणे अश्या अनेक अडचणी आहेत.

मनोज शालिग्राम महाजन (शिक्षक) 

आयईएस नवी मुंबई हायस्कूल, वाशी

Back to top button