Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २८ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २८ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

 

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: श्रीगणेश म्‍हणतात की, आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्‍नशील असाल. ध्येय गाठण्यासाठी जवळच्या नातेवाईकाचीही साथ मिळेल. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्‍याने कुटुंबावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. आर्थिक प्रश्‍नी थोडी धावपळ देखील शक्य आहे. कोणताही ताण घेवू नका, संयमाने वेळ घालवा.

वृषभ : आज अध्यात्मिक आणि गूढ शास्त्र जाणून घेण्यात तुमची आवड वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांना काही कारणास्तव करिअरशी संबंधित योजना टाळाव्या लागतील. एखाद्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कामे योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नाते घट्ट ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. घराची सुव्यवस्था राखण्यासाठी तडकाफडकी निर्णय घेऊ नका. धीर धरा आणि परिस्थिती सकारात्मक बनवा. रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. जुन्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीचे नाते घनिष्ठ होईल.

कर्क : आज गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. गृहिणी आणि नोकरदार महिला त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकतील. काहींनी तुमच्‍यावर टीका केली तरी तुमचे नुकसान होणार नाही. आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्‍या. व्यापारात सुधारणा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह: आज ग्रहांची स्थिती अत्यंत समाधानकारक असल्याचे श्रीगणेश सांगतात. घरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे उत्साही वातावरण निर्माण होईल. तुमच्या स्वभावाचा काही लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात याची जाणीव ठेवा. इतर लोकांची प्रकरणे सोडवण्याच्या घाईत तुम्ही काही फायदेशीर संधी गमावू शकता. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या : तुमच्या सामाजिक सीमाही वाढू शकतात;पण तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तीला सहभागी करून घेऊ नका. कोणतीही योजना करण्यापूर्वी पुनर्विचार करणे आवश्‍यक, असे श्रीगणेश सांगतात. कामात वारंवार व्यत्यय आल्याने तुम्हाला निष्काळजीपणाचा अनुभव येऊ शकतो. कार्यक्षेत्रात एकाग्रता अत्यंत आवश्यक असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

तूळ: आज तुमचे लक्ष चुकीच्या कामांपासून दूर ठेवा. केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. शुभचिंतकाच्या मदतीने इच्छा पूर्ण होईल. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही गोंधळ झाल्यास घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवर ताण येऊ देऊ नका. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रांत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या राजकारणाचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज काही अडचणी येतील; पण तुम्ही तुमच्या बुद्धी आणि हुशारीने समस्या सोडवाल. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवल्याने नाते दृढ होईल. इतरांच्या मालमत्ता प्रश्‍नी ढवळाढवळ करू नका. स्त्री वर्गाने सासरच्या पक्षाशी संबंध बिघडू देऊ नयेत. मुलांचा कोणताही हट्टीपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. दिवसाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक समस्या जाणवतील.

धनु: गणेश सांगतात की, आज तुम्ही आराम घेण्‍याच्‍या मूडमध्‍ये असाल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल. काही महत्त्वाचे काम केल्याने मन प्रसन्न राहील. संयुक्त कुटुंबात काही वाद होऊ शकतात. संयम आणि शहाणपणाने त्‍यावर तोडगा काढा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक ठरू शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. मानसिक तणाव आणि रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे त्रास होण्‍याची शक्‍यता.

मकर : आज दुपारनंतर परिस्थिती अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. घाईगडबडीत घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही स्वप्ने अपूर्ण राहिल्याने मन थोडे निराश होऊ शकते. आज व्यावसायिक कामे मंदावतील. महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवण्‍याची शक्‍यता.

कुंभ: अनेक दिवसांपासून विस्कळीत असलेल्या गोष्टी आज पुन्हा व्यवस्थित होऊ लागतील, असे श्रीगणेश सांगतात. आज कोणताही निर्णय घेताना स्‍वनिर्णयाला महत्त्‍व द्‍या. भावंडांच्या नात्यात गोडवा ठेवा. आज प्रवास टाळा.

मीन: कोणतेही काम करण्‍यापूर्वी काळजीपूर्वक विचार करुनच निर्णय घ्‍या. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढू शकते. घरातील वातावरण एखाद्या गोष्टीमुळे खराब होऊ शकते. संयम ठेवा. आवश्यक कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक त्रासातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

Back to top button