आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, २४ मार्च २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, २४ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : भूतकाळात झालेल्या चुका आज सुधारा. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे लोकांशी संबंधांमध्ये आश्चर्यकारक सुधारणा होईल. चुकीच्या मौजमजसाठी वेळ वाया घालविल्‍यास वैयक्तिक कामे रखडतील. घरातील ज्‍येष्‍ठांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही सकारात्मक बदल होतील. पती-पत्नीमधील संवाद वाढेल. घशाच्‍या संसर्गाकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ : आज ग्रहांचे संक्रमण सकारात्मक राहील, असे श्रीगणेश सांगतात. रखडलेल्या कामांना गती मिळेल. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे लाभ मिळेल. स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. कारण त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो. अनोळखी व्‍यक्‍तींशी नातेसंबंधाचा प्रस्‍थापित करण्‍यापूर्वी विचार करुन निर्णय घ्‍या. कुटुंबाच्या सहकार्याने कामात लक्ष द्या. कामाच्या जास्त ताणामुळे डोकेदुखी होऊ शकते.

मिथुन: आज घरी पाहुण्‍यांच्‍या आगमनामुळे उत्सवाचे वातावरण राहील. आत्मविश्वासाच्‍या जोरावर यश मिळवाल. उत्पन्नाचे साधन वाढेल त्‍याचबरोबर खर्चाचे प्रमाणही वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अंतर्गत व्यवस्थेत काही बदल घडवून आणा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्‍या मेहनतीचे योग्य फळ मिळलेल. जवळच्या मित्राच्या पाठिंब्याने धैर्य वाढेल. राजकीय किंवा न्यायालयाशी संबंधित प्रकरणाचा तणाव जाणवेल. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आर्थिक बाबींमध्‍ये स्‍थिती संतुलित राहिल. विपरीत परिस्थितीत मनौधैर्य कायम ठेवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्‍बवळावर परिस्थिती सुधारण्यास सक्षम असाल. वैवाहिक जीवनात चांगले सामंजस्य राखले जाईल. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : घरात जवळच्या नातेवाईकाचे अचानक आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर झाल्यामुळे दिलासा मिळेल. चुकीच्या वादापासून दूर राहा. वारसा हक्काच्या वादावरून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचा संशयी स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक छोट्या-छोट्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

तूळ: श्रीगणेश सांगतात की, आज समाजिक कार्यात आपले योगदान द्या. जनसंपर्काच्या व्याप्तीबरोबरच तुमची लोकप्रियताही वाढेल. राजकीय लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक व्‍यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. वातावरणातील बदलाचा प्रकृतीवर परिणमा जाणवेल.

वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज घरात धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल, तुमचा तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन समाजात तुमचा आदर करेल. नकारात्मक विचारांमुळे मनोबल कमी होऊ शकते. त्‍यामुळे दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आपले लक्ष फक्त वर्तमान परिस्थितीवर केंद्रित करा. उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढेल. एकमेकांशी सुसंवाद बिघडल्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. शिळे अन्न खाणे टाळा.

धनु : आज मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे काम होऊ शकतात. घरात आनंदी वातावरण राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुमचा आदर्शवाद तुम्हाला सन्मान मिळवून देईल. मात्र अति आदर्शवादी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज मनःस्थिती थोडी विस्कळीत होऊ शकते. काही काळापासून मंद गतीने सुरू असलेली व्यावसायिक कामे वेग घेतील. पती-पत्नी सुसंवादातून समस्‍येवर मार्ग काढतील.

मकर : श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान समाधानकारक राहील. सर्व कामे शांततेने पूर्ण होतील. एखाद्‍या गोष्‍टीत तुमचे निर्दोषत्व सिद्ध होऊ शकते. मात्र कर्ज घेणे टाळा. दिलेला शब्‍द पाळा. अन्यथा तुमची छाप खराब होऊ शकते. व्यावसायिक कामे थोडी मंद असू शकतात. पती-पत्नीचे भावनिक नाते घनिष्ठ होईल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आज काही अडचणी असूनही तुम्ही तुमच्या सकारात्मक विचाराने कार्ये सांभाळाल. हळूहळू परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल. कौटुंबिक गोष्टींबद्दल नातेवाईकांमध्ये तणाव असू शकतो. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्यास कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. आरोग्य चांगले राहिल.

मीन : आज आर्थिक स्‍थिती सुधारल्‍याने दिलासा मिळेल. धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. समाजात मान-अपमानाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सकारात्‍मक विचार करा. व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आनंदी व्यवहार होईल. प्रकृती ठीक राहिल.

Back to top button