Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, १९ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, १९ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: श्रीगणेश म्‍हणतात की, आज कठोर परिश्रम कराल. प्रिय व्यक्तीला अडचणीत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. अचानक काही खर्च होऊ शकतो. निर्णय घेताना संभ्रम असेल तर कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचे मार्गदर्शन घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आज तुम्ही घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरतील, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. संवाद साधताना नकारात्मक शब्दांचा वापरू करु नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. वैवाहिक जीवन आणि कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे राहिल.

मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज घाई गडबडीत काम करणे टाळा. शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. संतुलित विचारसरणी तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. अतिविचार टाळा. मार्केटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क : मनाप्रमाणे कामांमध्ये चांगला वेळ घालवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. तरुण करिअरकडे पूर्ण लक्ष देतील. काहीवेळा इतरांच्या सल्‍ला तुमच्‍यासाठी त्रासदायक ठरेल. नकारात्मक विचार टाळा. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

सिंह: नवीन योजना फायदेशीर ठरतील. अतिकामच्‍या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भूतकाळाचा विचार न करता वर्तमानात जगायला शिका. कोणतेही काम घाई न करता सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील, असे श्रीगणेश सांगतात. महिलांसाठी आजचा दिवस आरामदायी असेल. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : आज ग्रहांची स्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. प्रवास टाळा. आळस किंवा अधिक चर्चा केल्याने तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात नाते मधुर होऊ शकते.

तूळ: आज कठोर परिश्रमाच्‍या जोरावर तुम्हाला यश मिळेल. भावंडांसोबतचे वाद टाळा. अनोळखी व्‍यक्‍तींशी व्यवहार करताना काळजी घ्या. काही लोकच तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीत काही बदल करावे लागतील, असे श्रीगणेश सांगतात. जोडीदारसोबत खरेदी वेळ जाईल.

वृश्चिक: आज काही जुने मतभेद दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. मुलांच्‍या समस्यांवर तोडगा निघाल्‍याने दिलासा मिळेल. स्वप्नांच्या जगातून बाहेर पडा आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यावर विश्वास ठेवल्याने त्रास होऊ शकतो. व्यवसायात परिश्रम जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती उद्भवू शकते. जोडीदाराशी योग्य सामंजस्य राहील.

धनु: श्रीगणेश म्हणतात की, आज आत्मपरीक्षणासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे. मित्रासोबत सहलीसाठी नियोजन होईल. जुन्या आठवणीही ताज्या होतील. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल. आज व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.

मकर: आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांवर जास्त बंधने घालू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. तुमच्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी कौटुंबिक वातावरण राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

कुंभ: श्रीगणेश सांगतात की, चांगल्या कामामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा, यावेळी परिस्थिती अनुकूल आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्नात स्‍वत:ला त्रास करुन घेवू नका. सध्याच्या व्यवसायासोबतच काही नवीन कामातही तुमची रुची वाढेल.

मीन : श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही आत्मविश्वासाने कोणत्याही संकटाचा सामना करू शकता. भविष्यातील योजना यावेळी प्रभावी ठरतील. कोणत्याही प्रकल्पात यश न मिळाल्यास विद्यार्थी निराश होतील. हार मानू नका आणि पुन्हा प्रयत्न करा. घरात देखभालीचा खर्च करण्यापूर्वी तुमच्या बजेटचा विचार करा. कामाचा अतिरिक्‍त व्‍याप असला तरी कुटुंबासाठी थोडा वेळ काढा.

Back to top button