Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १७ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १७ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

 

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्‍हाला भावाच्या किंवा बहिणीची मदत मिळेल. घरातील सणासुदीचे वातावरण तुमचे तणाव कमी करेल. तुम्हीही यात सहभागी व्हाल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. चर्चासत्र आणि प्रदर्शने तुम्हाला नवीन ज्ञान आणि संपर्क प्रदान करतील.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या गुंतवणुकीबद्दल गौपनीयता ठेवा. जोडीदाराच्‍या निष्काळजीपणामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. कोणत्याही परिस्थितीत, आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये.

मिथुन : आज तुम्हाला आई किंवा वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्‍यावी लागेल. आर्थिक ताण येईल; पण नातेही घट्ट होईल. तुमच्या वरिष्ठांना गृहीत धरू नका. समस्यांवर तत्‍काळ तोडगा काढण्‍यासाठी प्रयत्‍नशील असाल, असे श्रीगणेश सांगतात.

कर्क : आज विजयाचा उत्सव तुम्हाला प्रचंड आनंद देईल. मित्र-मैत्रिणी सहाय्यक वाटतील. बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौशल्य दाखवण्याच्या संधी मिळेल. घराची पुनर्रचना करण्याची योजना असेल; आज तुम्हाला मोकळा वेळ मिळणार नाही.

सिंह : आज आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही प्रवास आणि पैसे खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल.मात्र यामुळे तुम्हाला खेद वाटेल. मित्र तुम्हाला निराश करू शकतात. भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकला, असे श्रीगणेश सांगतात. सायंकाळी अचानक पाहुणे आल्‍याने नियोजन कोलमडेल.

कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर परतावा देईल. जोडीदाराशी बोलताना काळजी घ्‍या.

तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक नियोजन कराल. नवीन मित्र बनवाल. आज सामजिक कार्यातही व्‍यस्‍त राहाल. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट संधी मिळाल्याने चांगला दिवस. आयटी व्यावसायिकांना नवीन संधी मिळेल.

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, पुरातन वस्तू आणि दागिन्यांमधील गुंतवणूक लाभदायक ठरेल. कौटुंबिक सदस्य तुमच्या जीवनात विशेष स्थान मिळवतील.जोडीदाराकडे लक्ष द्‍या. सहकारी आणि वरिष्ठांनी पूर्ण सहकार्य केल्याने कार्यालयातील कामाला गती मिळेल. आज मनोरंजनासाठी वेळ काढाल.

धनु : श्रीगणेश सांगतात की, तुम्हाला आकर्षित करणार्‍या गुंतवणुकीबाबत संपूर्ण माहिती घेवूनच निर्णय घ्‍या. कोणत्‍याही गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांना प्राधान्य द्या. संध्याकाळी थोडा आराम करा. आज तुमच्‍यातील सर्जनशील क्षमता तुम्हाला अनपेक्षित बक्षिसे देईल.

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, आज मित्रांना मदत कराल. आर्थिक नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्‍या मताचा आदर करतील.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करावे लागेल. आज तुम्‍हाला फावला वेळ मिळेल. तुमच्या आवडत्‍या गोष्‍टींसाठी वेळ देवू शकाल. जोडीदारासोबतचा वाद टाळा.

मीन : आज कोणालाही पैसे देताना विचारपूर्वकच निर्णय घ्‍या. नातेवाईक आणि मित्रांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची क्षमता उल्लेखनीय असेल.

Back to top button