Stock Market Closing Bell : शेअर बाजारात ‘विक्री’चा मारा, सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला | पुढारी

Stock Market Closing Bell : शेअर बाजारात 'विक्री'चा मारा, सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील कमकुवत संकेताचे परिणाम आज (दि.२६ फेबुवारी) देशातंर्गत शेअर बाजारावर उमटले. व्‍यवहाराला प्रारंभ होतानाच गुंतवणूकदारांचा कल नफ्‍याकडे राहिला.  बाजारात जोरदार विक्री झाली. प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बाजार बंद हाेताना सेन्सेक्स 352 अंकांनी घसरून 72,790 वर तर निफ्टीही 90 अंकांनी घसरून 22,122 वर बंद झाला.आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. याआधी शुक्रवारी (दि. २४ फेब्रवारी ) सेन्सेक्स 15 अंकांनी घसरून 73,142 वर बंद झाला होता.

आज आठवडयाच्‍या पहिल्‍या दिवशी व्‍यवहार सुरु होताच सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला तर निफ्टीही 60 अंकांची घसरण अनुभवली. सेन्सेक्स सुमारे 72,900 च्या पातळीवर तर निफ्टी 22,150 च्या पातळीवर आला. बँकिंग समभागांच्या घसरणीमुळे बाजारावर दबाव आला. इतर महत्त्वाच्या डेटासह सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न (जीडीपी) आकडे जाहीर होण्याआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्‍याचे दिसले.

सुरुवातीच्‍या घसरणीनंतर निफ्टी दिवसाच्या नीचांकावरून 60 अंकांनी सुधारला. सेन्सेक्स 389.69 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी घसरून 72,753.11 वर आणि निफ्टी 111.70 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी घसरून 22,101.00 वर व्यापार करताना दिसले. दुपारी तीन वाजण्‍याच्‍या सुमारास सेन्सेक्स 366 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी घसरून 72,776.54 वर आणि निफ्टी 89.30 अंकांनी किंवा 0.4 टक्क्यांनी घसरून 22,123 वर व्यवहार करत होता. सुमारे 1756 शेअर्स वाढले होते. 2187 समभाग घसरले होते. 146 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री

आज सलग दाेन सत्रांमधील तेजीनंतर मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकानीही घसरण अनुभवली. कापड, रेल्वे, ऊर्जा, संरक्षण समभागात वाढ झाली. तर साखर, रिअल इस्टेट, पेपर, पेंट क्षेत्रात घसरण झाली. आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली आहे. तर मेटल आणि फार्मा मध्ये खरेदी होत आहे. निफ्टी एशियन पेंट्स सर्वाधिक 4 टक्क्यांनी घसरला आहे.

निफ्टीमधील ‘हे’ शेअर्स ठरले सर्वाधिक लाभधारक

पॉवर ग्रिड कॉर्प, एल अँड टी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे निफ्टीचे सर्वाधिक लाभधारक शेअर्स ठरले.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने मजबूत सुरुवात केली

आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने दमदार सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५ पैशांनी मजबूत होऊन ८२.८९/$ वर उघडला.

हेही वाचा : 

 

Back to top button