दरमहा नियमित आणि भरघोस डिव्हिडंड देणारा फंड | पुढारी

दरमहा नियमित आणि भरघोस डिव्हिडंड देणारा फंड

भारतीय गुंतवणूकदारांच्या मनामध्ये सध्या दुहेरी संभ्रम आहे. वाढता महागाई दर, वाढते व्याज दर, अमेरिकेतील फंड रिझर्व्हचे व्याज दर वाढीचे धोरण, आटोक्यात न आलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील मंदी या गोष्टींमुळे 2023 मध्ये बाजाराची स्थिती काय राहील हे सांगता येत नाही. शिवाय पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यांचाही बाजारावर परिणाम होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बँकांमधील ठेवीचे दर 7.25 ते 7.75 टक्के सरासरी आहेत. परंतु, त्याचबरोबर महागाई दर कमी होईल तसे ते व्याज दर कमी व्हायला सुरुवात होईल.

म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकालीन आणि मध्यमकालीन गुंतवणूक करणार्‍याचा वर्ग मोठा असतो. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या उदरनिर्वाह महिन्याकाठी मिळणार्‍या बँकेमधील ठेवींच्या किंवा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीवर मिळणार्‍या डिव्हिडंड किंवा व्याजाच्या उत्पन्नावर चालवावा लागतो, अशा लोकांची गुंतवणूकही मोठी असते. वर जे म्हटले आहे. गुंतवणूकदारांच्या मनात दुहेरी संभ्रम आहे, ते याच वर्गाच्या बाबतीत म्हटलेले आहे. कारण इथून पुढे व्याज दर वाढण्याची शक्यता खूप कमी आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी, तर बाजारातही अनिश्चिततेचे वातावरण आहे.

Dynamic Asset Allocation किंवा Balanced Advantage फंडांची माहिती आपण पूर्वी घेतलेली आहे. सध्याच्या काळासाठी अत्यंत आदर्श असा हा म्युच्युअल फंडांचा प्रकार आहे. या फंडांमध्ये निश्चित होऊन गुंतवणूक का करावी? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर बाजार तेजीच्या शिखरावर असेल तेव्हा फंड मॅनेजर Profit Book करून शेअर्समधील गुंतवणूक कमी करतो आणि बाजार खूप खाली गेला असेल, तर शेअर्समधील गुंतवणूक वाढवतो.

HDFC Balanced Advantage Fund हा या प्रवर्गातील आपल्या भरीव कामगिरीत सातत्य राखणारा एक अत्यंत यशस्वी फंड आहे. 1 फेब्रुवारी 1994 रोजी सुरू झालेल्या या फंडाची व्यवस्थापित मालमत्ता (AUM) 31 जानेवारी 2023 रोजी 51 हजार कोटींच्या वर आहे. यावरून या फंडाची प्रचंड लोकप्रियता तुमच्या लक्षात येईल. श्री. श्रीनिवासन राममूर्ती आणि श्री. गोपाल आगरवाल हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत.

हा फंड लोकप्रिय होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे IDCW ऑप्शनअंतर्गत हा फंड दरमहा देत असलेला डिव्हिडंड! (ID CW म्हणजे Income Distribution Cum Capital Withdrawal पूर्वीच्या Dividend Option चे हे सेबीने बंधनकारक केलेले नवे नाव) हा फंड 2003 पासून डिव्हिडंड देत असला, तरी जून 2018 पासून तो नियमितपणे दरमहा डिव्हिडंड देत आहे. गेल्या दहा वर्षांतील या फंडाची आर्थिक कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

परंतु इथे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामधून मिळणार्‍या डिव्हिडंड रकमेची taxability लक्षात घ्यावी. डिव्हिडंडची रक्कम रु. 5000 पेक्षा अधिक होत असेल, तर अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी 10 टक्के कर कपात करून (TDS) तुम्हाला डिव्हिडंडची रक्कम वर्ग करेल. तुम्ही जर 15 जी किंवा 15 एच फॉर्म कंपनीला दिला असेल, तर टीडीएस होणार नाही. तुम्हाला मिळणारी एकूण डिव्हिडंडची रक्कम ही Taxable होत असल्यामुळे तुमच्या एकूण taxable income मध्ये ती जमा धरून त्यावर तुमच्या Income slab नुसार त्यावर कर आकारला जाईल.

भरत साळोखे

Back to top button