Cryptocurrency markets : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ब्लडबाथ! बिटकॉईनसह प्रमुख करन्सीत मोठी घसरण | पुढारी

Cryptocurrency markets : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ब्लडबाथ! बिटकॉईनसह प्रमुख करन्सीत मोठी घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क

क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency markets) कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. CoinMarketCap च्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळल्यामुळे गेल्या २४ तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट ५.५४ टक्क्यांनी घसरून ते १.२४ लाख कोटी डॉलरवर आले आहे. एकूणचं प्रमुख क्रिप्टोकरन्सी घसरल्याचे दिसून आले आहे.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनची (Bitcoin) किंमत पुन्हा एकदा ३० हजार डॉलरच्या खाली आली आहे. बिटकॉइनमध्ये (Bitcoin) तब्बल ६.१४ टक्क्यांनी घसरण दिसून आली आहे. यामुळे बिटकॉइन २९,८२३ डॉलरवर व्यवहार करत आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी समजली जाते.

Ethereum देखील तब्बल ५.६३ टक्क्यांनी खाली आले आहे. तर USDT टिथरने गेल्या २४ तासांत त्याच्या मूल्यामध्ये ०.०२ टक्के वाढ दर्शविली आहे. BNB टोकन घसरले आहे. ही घसरण ५.५९ टक्क्यांची आहे. सोलाना (Solana) ही क्रिप्टोकरन्सीदेखील १२.७३ टक्क्यांनी घसरली आहे.

लोकप्रिय memecoin Dogecoin’s (DOGE) ची किंमत गेल्या २४ तासांत ५.५७ टक्क्यांनी कमी झाली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत DOGE सध्या १०व्या क्रमांकावर आहे. XRP Ripple लाल निशाण्यावर आहे. गेल्या २४ तासांत त्यात ५.९८ टक्के घसरण दिसून आली आहे.

Cryptocurrency markets : क्रिप्टोकरन्सींचा व्यवहार होतो कसा?

बिटकॉईनचा व्यवहार हा कोडद्वारे केला जातो. जर तुम्हाला बिटकॉईन खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला त्याचे कीज (कोड्स) मिळते. ज्याद्वारे जगभरात पसरलेल्या नेटवर्कमध्ये व्हेरिफाय केले जाते. जेव्हा तुम्हाला बिटकाईन विकायचा असेल, तुम्हाला मिळालेला नवा कोड विकावा लागेल. खरंतर आता मार्केटमध्ये कित्येक एक्सचेंज अ‍ॅप आलेले आहेत जे कमिशनवर काम करतात.

कोणतीच बँक क्रिप्टोकरन्सींवर नियंत्रण ठेवत नाही

बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी या चलनांमागे नेमकं कोणतं तंत्रज्ञान होतं? तर, त्याला ब्लॉक टेक्नॉलोजी असं नाव आहे. ब्लॉक आणि चेन या इंग्रजी नावांमध्ये आपल्याला हा खेळ समजून घेता येईल. असं समजा, हा एक डाटाबेस आहे. ज्यामध्ये लाखो ब्लॉक्स म्हणजे कम्प्युटर्सची चेन आहे.

जे इंटरनेट नेटवर्कसोबत जोडलेले आहे आणि सर्वांमध्ये ट्रान्जेक्शनचा डेटा सेव्ह करून ठेवला आहे. सहाजिक कोणतीही एक व्यक्ती, कायदेशीर व्यक्ती किंवा सरकार त्यावर नियंत्र मिळवू शकत नाही. कोणीही हॅक करू शकत नाही की, कोणतीही छेडछाड करू शकत नाही. त्यामुळेच बिटकॉईनला सुरक्षित चलन मानलं जातं. कारण, त्याच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही.

Back to top button