बिटकॉईन आणि इथरला विसरा – या क्रिप्टोने दिला सर्वाधिक परतावा (cryptocurrency return) | पुढारी

बिटकॉईन आणि इथरला विसरा - या क्रिप्टोने दिला सर्वाधिक परतावा (cryptocurrency return)

बिटकॉईन, इथर यांच्यापेक्षा BNB Cryptocurrency ने दिला सर्वाधिक परतावा ( Return )

मुंबई : पुढारी ऑनलाईन – सरत्या वर्षांत क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency ) फारच चर्चेत राहिली. विविध चढउतार, निर्बंधांचे प्रयत्न यामुळे क्रिप्टोकरन्सीबद्दल विविध चर्चा होत राहिल्या. क्रिप्टोकरन्सीचं नाव घेतले तर सर्वांत आधी बिटकॉईन आणि त्यानंतर इथर या दोन क्रिप्टोकरन्सींची सर्वाधिक चर्चा होते. पण तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार बिटकॉईन आणि इथर या दोन करन्सीपेक्षा बिनान्स कॉईन (BNB) या तिसऱ्या क्रमकांवर असलेल्या क्रिप्टोकरन्सीने सर्वाधिक परतावा  (cryptocurrency return) दिलेला आहे 

बिनान्स होल्डिंग या कंपनीच्या माध्यमातून BNB उपलब्ध करून दिली जाते. 

आरकेन रिसर्च या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार BNBच्या मूल्यात १३०० टक्के इतकी घसघसशीत वाढ झालेली आहे. तर सध्या मार्केट लीडर असलेल्या बिटकॉईनचे मूल्य ६५ टक्के इतके वधारले आहे. 

Cryptocurrency मध्ये सर्वाधिक इथरचा परतावा (Return) किती?

एकूण क्रिप्टो मार्केटचा (cryptocurrency) विचार केला तर इथर ही करन्सी दुसऱ्या स्थानावर आहे. इथरच्या मूल्यात ४०८ टक्के इतकी वाढ झालेली आहे. 

एकूण आकाराचा विचार केला तर जगातील सगळ्यात मोठे क्रिप्टो एक्सचेंज बिनान्स हे आहे. यावर BNBचा वापर सर्वाधिक प्रमाणावर केला जातो. बिनान्स स्मार्ट चेन या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मची नेटिव्ह करन्सी ही BNB आहे. 

२०२१मध्ये डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूकदारांचा रस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून आले. याचा फायदा altcoins यांनाही झाला आहे. यामध्ये Fantom आणि Solana यांचा समावेश आहे.

हेही वाचलं का?

Back to top button