एस.बी.आय.इन्शुअरन्स | पुढारी | पुढारी

एस.बी.आय.इन्शुअरन्स | पुढारी

या वेळचा चकाकता हिरा म्हणून ‘एस.बी.आय.इन्शुअरन्स’चा विचार करता येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया हिने विमा व्यवसायात अन्य कंपन्यांप्रमाणेच  पदार्पण केले आहे. हिने नुकत्याच अनेक योजना सुरू केल्या आहेत. कॅन्सर रोगावर देखील ती विमा पॉलिसी देते. स्टेट बँकेचा  पाठिंबा असल्यामुळे तिला भांडवलाची कधीच कमतरता भासणार नाही. मार्च 2018 ला संपणार्‍या वर्षासाठी तिचे हप्त्याचे एकूण उत्पन्‍न 25 हजार 500 कोटी रुपये व्हावे. 2017 मार्चच्या 20 हजार 852 कोटी रुपयाच्या हप्त्याच्या उत्पन्‍नात 25 टक्के वाढ आहे. 2019 व 2020 मार्चसाठीच्या अपेक्षित उत्पन्‍नात 25 टक्के वाढ होऊन हप्त्यांचे संभाव्य उत्पन्‍न अनुक्रमे 32 हजार 450 कोटी रुपये व 40 हजार 700 कोटी रुपये व्हावे. गुंतवणुकीवरील उत्पन्‍न व अन्य उत्पन्‍न जमेस धरले तर 2018 मार्चसाठी उत्पन्‍न 36 हजार 200 कोटी रुपये व्हावे. मार्च 2019 साठी हा आकडा 45 हजार 250 कोटी रुपये व्हावा व 2020 मार्चसाठी हा आकडा 55 हजार 600 कोटी रुपये व्हावा. नक्‍त नफा 2017 मार्चसाठी 955 कोटी रुपये होता.

पुढील तीन वर्षांत तो अनुक्रमे 980 कोटी रुपये, 1040 कोटी रुपये व 1150 कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन मार्च 2017 साठी 9.50 रुपये होते ते 2020 मार्चमध्ये 11.50 रुपये व्हावे. सध्या शेअरचा भाव 668 रुपये आहे. तो वर्षभरात 860 रुपये व्हावा. स्मार्ट बचत नावाखाली तिने नुकतीच एक योजना सुरू केली आहे. 5 पासून 15 वर्षांपर्यंत अशी पॉलिसी मिळू शकते. देशातील दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या शहरात तिच्या शाखा आहेत. 

एच.डी.एफ.सी. लाईफ इन्शुरन्स आणि आय. सी. आय. सी. आय. प्रो लाईफ इन्शुअरन्स कंपन्यांनंतर तिचा तिसरा क्रमांक लागतो. कंपनीचे कार्यकारी संचालक व प्रमुख अधिकारी म्हणून नुकताच संजीव नौटियाल यांनी पदभार स्वीकारला आहे. 

कंपनीचे गुंतवणुकीवरील उत्पन्‍न 2012 मार्चमध्ये फक्‍त 102 कोटी रुपये होते. ते यंदा 425 कोटी रुपये व पुढील दोन वर्षी संभाव्य 485 कोटी रुपये व 525 कोटी रुपये व्हावे. नक्‍त नफा मार्च 18 ते मार्च 20 या तीन वर्षासाठी अनुक्रमे 970 कोटी रुपये, 1042 कोटी रुपये व 1150 कोटी रुपये व्हावे. त्यामुळे सध्या या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास 95 टक्के नफा सहज व्हावा. स्टेट बँकेबरोबरच  प्रवर्तक म्हणून बीएनपी परिवास या फ्रेंच बँकेचा प्रवर्तक म्हणून सहभाग आहे. त्यामुळे जागतिक व्यवसायासाठी कंपनीचे  प्रमुख कार्यालय पॅरिस येथे आहे. कंपनीची स्थापना 2001 साली झाली आहे.

Back to top button