पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास रिटर्न कसे भरावे?

पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास रिटर्न कसे भरावे?
Published on: 
Updated on: 

[author title="कमलेश गिरी" image="http://"][/author]

आयकर विभागाने पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही मुदत गेल्या वर्षीच संपली असून, त्यापूर्वी लिंक न करणार्‍यांचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. पॅनकार्ड बंद झाल्यामुळे करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जेव्हा एखादा करदाता आयकर रिटर्न भरण्यासाठी जातो तेव्हा यासाठी देखील पॅनकार्ड आवश्यक असते. आता जर तुम्ही तुमचा पॅन डेडलाईनपर्यंत आधारशी लिंक केला नसेल आणि पॅन निष्क्रिय झाले असेल, तर आयटीआर कसा भरायचा, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. पॅनकार्डशिवाय रिटर्न भरताना अडचणी येतात, पण ते भरणे शक्य आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी ऑडिटची आवश्यकता नसणार्‍या करदात्यांसासाठी दंडाशिवाय आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 जुलै 2024 पर्यंत आहे.

अशा वेळी पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते आयटीआर फाईल करण्यासाठी आधार ओटीपीची मदत घेऊ शकतात. आधार ओटीपी पडताळणीच्या मदतीने बंद पॅनच्या बाबतीत आयटीआर दाखल केला जाऊ शकतो. त्यानंतर, रिटर्नची पडताळणी करण्यासाठी, करदात्यांना नेट बँकिंग, एटीएम इत्यादी पर्यायी पद्धतींद्वारे इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड तयार करावा लागेल.

याद्वारे आयटीआर भरता येणे शक्य होणार असले, तरी रिफंड मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. कारण आयकर विभागाने स्पष्टपणे सांगितले होते की, ज्यांचे पॅन आधारशी लिंक नाही अशा करदात्यांच्या आयकर परतावा दिला जाणार नाही. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत होती. तथापि, काही शुल्क भरून पॅन अद्याप आधारशी लिंक केले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news