फाॅलाे द ट्रेंड | पुढारी | पुढारी

फाॅलाे द ट्रेंड | पुढारी

भूषण गोडबोले

मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33176 अंकाला तसेच निफ्टी 10195 अंकाला बंद झाला. सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने  509 अंकांची तसेच निफ्टीने 165 अंकांची मंदी दर्शवली. साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक नकारात्मक म्हणजेच मंदीचा कल दर्शवत आहे. अल्पावधीच्या आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी निफ्टीची 10142 सेन्सेक्सची 32991 तसेच ही महत्त्वाची आधार पातळी आहे. आगामी कालावधीमध्ये सेन्सेक्सने 32991 तसेच निफ्टीने 10142 या महत्त्वाच्या पातळीखाली बंद भाव दिल्यास निर्देशांकात आणखी घसरण होऊ शकते. मागील लेखामध्ये नमूद केल्यानुसार टाटा स्टील या कंपनीच्या शेअर्सचा भाव जोपर्यंत 662 या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत अल्पावधीच्या आलेखानुसार नकारात्मक कल दर्शवत आहे. आगामी कालावधीमध्ये 594 या पातळीखाली बंद भाव दिल्यास टाटा स्टील या कंपनीच्या  शेअर्समधे आणखी घसरण होऊ शकते.

आलेखानुसार हेज या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात 3144 या पातळीच्या वर बंद भाव देऊन सकारात्मक संकेत दिले आहेत. जोपर्यंत हेज या कंपनीच्या शेअर्सचा भाव 2412 या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सकारात्मक कल दर्शवत आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये निर्देशांक नकारात्मक कल दर्शवत असल्याने जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत गुतंवणूकदारांनी गडबड करून तेजीचे व्यवहार करू नयेत कारण शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर होण्यासाठी फॉलो द ट्रेंड म्हणजेच मर्यादित धोका स्वीकारून स्टॉप लॉस तंत्राचा वापर करून तेजीच्या काळात तेजीचे तसेच मंदीच्या काळात मंदीचे व्यवहार करणे किंवा योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक असते..

(सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्‍लागार)

Back to top button