एनपीएस – निवृत्तीपश्‍चात जीवनाचा भक्‍कम आधार | पुढारी

एनपीएस - निवृत्तीपश्‍चात जीवनाचा भक्‍कम आधार

आतापर्यंत आपण NPS विषयी संपूर्ण महिती घेतली. आता या योजनेत आपल्याला भाग घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा? NPS चे खाते उघडण्यासाठी काय करावे लागते? आपण थोडक्यात याची माहिती घेऊ.

NPS चे खाते आपल्याला दोन प्रकारे उघडता येते. एक Online आणि  दुसरा प्रकार म्हणजे Offline प्रथम आपण Online खाते कसे सुरू करायचे याची माहिती घेऊ. Online NPS खाते उघडण्यासाठी आपल्याजवळ पुढील गोष्टी तयार असाव्या लागतील.

1) मोबाईल फोन क्रमांक.

2) ई-मेल आयडी.

3) इंटरनेट बँकिंगची सुविधा असलेले कोणत्याही बँकेतील खाते.

4) आधार क्रमांक (आपला मोबाईल क्रमांक त्याच्याशी संलग्न असला पाहिजे.)

5) आपला फोटो, कॅन्सल्ड चेक आणि सहीचा नमुना याच्या डलरप केलेल्या प्रती.

6) तुमच्या बँक खात्यामध्ये किमान रु. 500/- (बँकेची किमान शिल्लक रक्‍कम सोडून) किंवा तुम्ही जितकी रक्‍कम NPS मध्ये भरणार आहात तेवढी रक्‍कम असली पाहिजे.

इतक्या गोष्टी तुमच्याजवळ तयार असतील तर खाली लिहिल्याप्रमाणे तुम्ही Online NPS खाते सुरू करू शकता.

1) eNPS  च्या वेबसाईटवर जा. (http://enps.nadl.com/enps/nationalfensionsystem.html.)

2) Registration वर क्‍लिक करा.

3) Online subdcriber registration page रिसश ओपन होईल. New registration सिलेक्ट करा. तुमचा आधार क्रमांक तिथे नोंद केल्यावर OTP जनरेट होईल. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP enter केल्यानंतर वर Continue क्लिक करा.

4) तुमचे नाव व Time Stamp असलेला acknowledgement  क्रमांक येईल सिलेक्ट करा.

5) यानंतर तुम्हाला तुमची वैयक्‍तिक माहिती तिथे भरावी लागेल. ती भरल्यावर Save & Proceed  वर क्‍लिक करा.

6) चार अ‍ॅसेट क्‍लासेसपैकी एक निवडा. त्यानंतर तुमच्या वारसदाराची नोंद करा.

7) तुमचा Cancelled चेक, तुमचा फोटो आणि सहीचा नमुना Upload करा.

8) शेवटी तुमचे पहिले Cotribution भरा. यासाठी तुमच्या नेट बँकिंगचा किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.

9) तुम्हाला पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर मिळेल (PRAN). त्यासोबत Payment  receipt ही मिळेल.

10) Download Registration Form/E Sign वर क्‍लिक करा.

ही झाली Online पद्धत. Offline खाते उघडण्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे उघडावे लागेल.

PFORA  ने नियुक्‍त केलेल्या कोणत्याही एका POPs मध्ये (Point of Presence) मध्ये जा. सर्व सरकारी बँका, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपन्या यांनी त्यांच्या कंपन्यांना POPs म्हणून enroll केले आहे.  

एकदा तुम्ही तिथे गेलात की तुमचे काम अतिशय सोपे होऊन जाते. तुमची KYC ची कागदपत्रे (Pan Card आणि आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी काहीही) आणि त्यांनी दिलेला फॉर्म भरून दिला की तुम्हाला एक 17 receipt number मिळतो. त्यानंतर तुमचे खाते उघडले की साधारण वीस दिवसांनी तुम्हाला PRAN क्रमांक मिळकतो. तुम्हाला तुमचे  PRAN Card ही मिळते. ते घेऊन तुम्ही तुमच्या POPS कडे गेला की त्यांच्या सल्लानुसार तुम्ही तुमची पुढील सर्व कार्यवाही करू शकता.  (समाप्त)

(अ‍ॅम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायझर)

Back to top button