तिमाही निकालांच्या घोषणेमधील लक्षात घ्याव्या अशा ८ बाबी | पुढारी

तिमाही निकालांच्या घोषणेमधील लक्षात घ्याव्या अशा ८ बाबी

सिद्धार्थ खेमका, हेड – रिटेल रिसर्च

भारतातील कॉर्पोरेट नियमांनुसार, सूचित भारतीय कंपन्यांना त्यांचे तिमाही निकाल शेअर बाजाराला नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे. तिमाही निकाल हा कंपनीच्या वर्तमान कामगिरीचे परीक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आज कंपन्या गेल्या वर्षीच्या तुलनेतील तिमाही निकाल तर प्रसिद्ध करतातच; शिवाय त्या पुढील काही तिमाहींसाठीचे अंदाजही (गाईडन्स) देतात. तेव्हा तिमाही निकालांचे विश्लेषण कसे करायचे आणि कंपनीचे तिमाही निकाल कसे वाचायचे? तिमाही निकाल समजून घेण्यासाठी आवश्यक असे 8 महत्त्वाचे मुद्दे आपण बघू.

1. टॉपलाइन वाढ आणि अंदाज 

कंपनीची टॉपलाइन वाढ होते ती कंपनीच्या एकंदर प्रमाणातून (व्हॉल्युम) किंवा दररचनेतून. यातील प्रमाणाच्या वाढीतून कंपनी प्रत्यक्ष किती वाढ साध्य करत आहे हे लक्षात येते, तर दररचनेतील वाढ कंपनीच्या दर ठरवण्याच्या शक्‍तीशी व उद्योगक्षेत्रातील स्थानाशी निगडित आहे. 

2. नफ्यातील वाढ व अंदाज

तिमाही निकालात निव्वळ नफा हा अत्यंत दर संवेदनशील असतो. खरे तर, उत्पन्नाच्या नमुन्यात अचानकपणे झालेल्या कोणत्याही बदलावर बाजारभाव तातडीने प्रतिक्रिया देतो. यात संपूर्ण नफाच नाही, तर विश्लेषकाच्या अपेक्षेनुसार निव्वळ नफा महत्त्वाचा ठरतो. 

3. तिमाहीतील उत्पन्नाचा दर्जा

उत्पन्नानुसार दर निश्चित होतात, तर या उत्पन्नाचा दर्जा कंपनीचे मूल्यांकन ठरवतो. उदाहरणार्थ, किमतीतील तात्पुरत्या स्वरूपाच्या उठावामुळे वाढ झाली असली तरी ती शाश्वत स्वरूपाची नसते. 

4. वर्षवार तुलना व तिमाहीवार तुलना 

वर्षागणिक झालेल्या तुलनेमुळे कामकाजातील विशिष्ट हंगामाचा परिणाम नीट पकडला जातो. मात्र, विभागांची वाढ बघताना वेगाने झालेले बदल समजून घेण्यासाठी तिमाहीवार तुलना करणे आवश्यक ठरते. 

5. गेल्या 4 तिमाहीतील अंदाज आणि कामगिरी

बहुतेक कंपन्या त्यांच्या भविष्यकालीन नियोजनांबाबत विधान करण्यासाठी पुढील काही तिमाहींचा अंदाज देतात. हे अंदाज काळजीपूर्वक बघितले पाहिजेत. कारण त्यातून कंपनीचे पुढील एक वर्षातील धोरण स्पष्ट होते. 

6. व्यवस्थापनाचे इशारे व लेखापरीक्षांच्या पात्रतेचा आढावा

घोषणेचा मसुदा तसेच त्यातील व्यवस्थापनाच्या मुलाखतींमधील शब्दांतून ध्वनित होणारा अर्थ वाचणे आवश्यक आहे. तिमाहीत झालेल्या व्यवस्थापनातील कोणत्याही मोठ्या बदलाचा विचार करणेही गरजेचे आहे. 

7. कार्यात्मक नफ्याचा प्रवाह व कार्यात्मक मार्जिन्स

कार्यात्मक नफ्याचा प्रवाह जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कंपनीला आपल्या प्रमुख ऑपरेशन्समधून किती उत्पन्न मिळत आहे हे त्यातून स्पष्ट होते. कंपनीचा व्यवसाय किती शाश्वत आहे याची कल्पना यातून येते. 

8. समभागधारणेचा नमुना आणि प्लेजविषयक आकडेवारी

तिमाहीदरम्यान समभागांची मोठ्या प्रमाणावर अंतर्गत विक्री (इनसायडर सेलिंग) होणे ही चिंतेची बाब समजली जाते. त्याचप्रमाणे समभागांचे अतिरिक्‍त प्लेजिंग झाल्यास स्टॉक असुरक्षित होतो. 

विश्लेषकांनी केवळ नफा व वाढीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हे सर्व मुद्दे एकत्र करून त्यांचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. 

(लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये हेड – रिटेल रिसर्चर आहेत.)

 

Back to top button