जाणून घ्या : पॅनकार्ड सांगेल सर्वकाही | पुढारी

जाणून घ्या : पॅनकार्ड सांगेल सर्वकाही

अपर्णा देवकर

जर आपण आतापर्यंत आर्थिक वर्ष 2019-20 साठी करसवलत मिळवण्यासंदर्भातील पुरावे सादर केले नसतील, तर आपल्याकडे 31 मार्चपर्यंत वेळ आहे. जर तोपर्यंत पुरावे सादर केले नाही, तर कर भरावा लागेल. त्याचबरोबर आतापर्यंत ज्यांनी आयटीआर दाखल केले नाही, त्यांनीही सजग राहणे आवश्यक आहे. कारण प्राप्‍तिकर विभागाकडून कर न भरणार्‍यांची सातत्याने स्कु्रटनी केली जाते आणि त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावत असते. 

पॅन नंबर प्रोफाइल सांगेल : आपल्याला आयटीआरची नोटीस येणार आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आपण पॅनकार्डचा उपयोग करू शकता. आपला दहा आकडी पॅन नंबर आपल्या टॅक्स प्रोफाइलचे विवरण सांगू शकतो. करविभाग आपल्या पॅन नंबरच्या आधारे टॅक्स प्रोफाइल तपासत असते. या आधारावर आपण आयटीआर दाखल केले की नाही, हे समजते. त्यानंतर सरकार आपले उत्पन्न आणि कराचा शोध लावते. आपण करचुकवेगिरी तर करत नाही ना? याचा शोध सरकार घेत असते. 

टॅक्स प्रोफाइल तपासा : आपला पॅन आपले टॅक्स प्रोफाइल सांगते. केंद्र सरकार देखील आपल्या पॅन नंबरच्या माध्यमातून काही मिनिटातच टॅक्स प्रोफाइल तपासत असते. आपण रिटर्न दाखल केले की नाही, याचा शोध लावते. त्यानंतर सरकार तपास सुरू करते. आपले उत्पन्न किती आहे आणि आपण कर चुकवत आहात का, याचा शोध घेते. 

नोटीसचा शोध : आपल्याला सर्वात अगोदर प्राप्‍तिकराच्या संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी आपले रिटर्न प्रोसेस झाले की नाही, हे समजू शकते. प्राप्‍तिकर नियमानुसार सर्व प्राप्‍तिकर रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे. जर प्राप्‍तिकर विभागाच्या रिकॉर्डमध्ये स्टेटस पेडिंग असेल, तर प्राप्‍तिकर विभाग नोटीस देईल. प्राप्‍तिकर विभाग रिटर्न भरण्याचे कारण देखील विचारू शकते. 

रिटर्नसाठी संकेतस्थळ तपासा : प्राप्‍तिकराच्या संकेतस्थळावर जाऊन आपण आपले रिटर्न पेडिंग आहे की नाही, हे तपासू शकता. नियमानुसार आपल्याला रिटर्न दाखल करणे बंधनकारक आहे. जर आपण रिटर्न दाखल केले असेल आणि ते प्राप्‍तिकर विभागाकडे पेडिंग दाखवत असेल, तर प्राप्‍तिकर विभाग आपल्याला नोटीस पाठवेल. आपण रिटर्न दाखल का करत नाहीत, असा सवाल प्राप्‍तिकर करू शकतील. 

टीडीएसचा शोध घ्या : जर आपल्याला टीडीएसचे आकलन करायचे असेल, तर प्राप्‍तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म 26 एएस पाहा. या फॉर्ममध्ये आपल्या पॅनवरून भरलेल्या टीडीएसचे विवरण दिलेले असेल.     

 

Back to top button