गर्भारपणातील मॉर्निंग सिकनेस | पुढारी

गर्भारपणातील मॉर्निंग सिकनेस

डॉ. प्राजक्ता गायकवाड

गर्भवतींना मॉर्निंग सिकनेस या नकोशा आजाराचा सामना करावा लागतो. नावात मॉनिर्र्ंग असले, तरी दिवसभरात उलटी होणे, मळमळणे असे त्रास या काळात उद्भवतात.

संबंधित बातम्या

महिलांना गर्भावस्थेत उलट्या-वांती होणे किंवा मळमळणे अशा समस्या उद्भवतात. यालाच मॉर्निंग सिकनेस असेही म्हटले जाते. पुरुषांनाही कधीकधी असा त्रास होतो. गर्भवतींच्या पतीलाही मॉर्निंग सिकनेस जडतो. काही विशेषज्ञांच्या मते मॉर्निंग सिकनेस ही एक भ्रामक संकल्पना आहे. याचे कारण ही समस्या दिवसभरात कधीही उद्भवू शकते. याची ठरावीक अशी कोणती वेळ निश्चित नसते. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत मॉर्निंग सिकनेसची समस्या महिलांना अधिक जाणवते; पण संपूर्ण गर्भावस्थेच्या कालावधीत ती वरचेवर उद्भवत राहते.

मळमळ : मळमळणे ही अनारोग्याची अशीच एक समस्या. मळमळणे हे मॉर्निंग सिकनेसचे लक्षण आहे. मळमळण्यामुळे व्यक्तीला भीती वाटते आणि उलटी आल्यासारखी वाटते. अनेकदा उलटी होतेसुद्धा. अशाप्रकारे आधी मळमळून येऊन उलटी झाल्यास त्यानंतर किमान सहा तासांपर्यंत पचायला जड असे पदार्थ खाण्याचे टाळावे. हलके, पचायला सोपे, विशेषकरून द्रव पदार्थांचे सेवन करावे. मळमळण्यावर चांगली औषधे उपलब्ध आहेत; मात्र त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

वारंवार उलटी होणे : मॉर्निंग सिकनेसमध्ये वारंवार उलटी होणे ही एक मोठी समस्या आहे. अपवादाने का असेना पण असा अनुभव येतोच. वारंवार उलटी होत राहिल्यास अन्न नलिकेचे नुकसान होते. अन्न नलिकेला धोका पोहोचल्याने उलटीतून रक्तही पडू शकते. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अन्य लक्षणे : मॉर्निंग सिकनेसच्या लक्षणांमध्ये अपचन, बद्धकोष्ठता, वजन वाढणे, जुलाब होणे, डोकेदुखी आणि दातदुखी यांचा समावेश होतो. भूक वाढणे किंवा मूड स्विंग, झोप न येणे आणि त्वचेवर खाज सुटणे असे त्रासही मॉर्निंग सिकनेसमुळे उद्भवू शकतात. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

Back to top button