International Yoga Day – बेली फॅट घालवण्यासाठी सर्वात सोपी ४ योगासने | पुढारी

International Yoga Day - बेली फॅट घालवण्यासाठी सर्वात सोपी ४ योगासने

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवसेंदिवस पोट वाढत जाताना निदर्शनास येते. विशेषत: महिलांना बेली फॅटची समस्या सर्वाधिक असते. लटकलेले पोट आपल्या शरीरयष्टीचा शेप बिघडवतात. चांगले चांगले कपडेदेखील आपण घालू शकत नाही. चालताना दमछाक होऊ लागते. आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. बेली फॅट घालवण्यासाठी सर्वात सोपी आणि सहजपणे जमणारी योगासने तुम्ही घरच्या घरी करू शकता. (International Yoga Day )

वाढलेल्या वजनामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि अन्य दुर्धर आजारदेखील होण्याची शक्यता असते. योग्य आहार आणि व्यायामामुळे तुम्ही बेली फॅट सहज घालवू शकता. यासाठी जीममध्ये घाम गाळण्याची आवश्यकता नाही, असे वाटते. तुम्ही घरच्या घरी ही सोपी आसने करू शकतात. नियमित योगासनांचा सराव करून तुम्ही उत्तम फिटनेस मिळवू शकता. मग, आजपासूनच सुरु करताय ना योगासने करायला.

​धनुरासन

कंबर, पोटवरील फॅट कमी करण्यासाठी धनुरासन उपयुक्त आसन आहे. पोटावर सरळ झोपावे. कपाळ जमिनिवर टेकवून दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा. पाय दुमडून टाचा पार्श्वभागाच्या जवळ आणा. आता डोके वर उचलून हनुवटी जमिनीवर ठेवा. उजव्या आणि डाव्या हातांनी अनुक्रमे उजव्या आणि डाव्या पायाचे घोटे धरून शरीर ताणून घ्या. याची रचना एखाद्या धनुष्यबाणाप्रमाणे दिसेल. यामुळे पोट, कंबर ताणले जाईल.

ताडासन

सर्वात सोपे आयन म्हणजे ताडासन, कधीही भारल्या उभारल्या तुम्ही करू शकता. याला विषिष्ट असा वेळ द्यावा लागत नाही. खासकरून बैठे काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या आणि कॉम्प्युटरवर तासनतास बसणाऱ्यांसाठी ताडासन उत्तम योगासन आहे. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ताडासन उत्तम आहे. ताडासनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

सुरुवातीला ताठ उभे राहा. आता टाचा आणि गुडघे एकमेकांजवळ आणा. दोन्ही हात हळूहळू आकाशाच्या दिशेने वर घ्या. सोबतच पायाचे पायाचे पंजेही वर उचलत न्यावे.

​पवनमुक्तासन

पवनमुक्तासन : ज्यांना गॅसची समस्या आहे, त्यांनी हे आसन तरूर करावे. या आसनामुळे गॅसेसच्या समस्या कमी होतात. पोटावरील फॅट कमी होणयासाठी अतिशय उपयुक्त असे पवनमुक्तासन आहे.

प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणून दोन्हा पाय वर उचला. नंतर पाय गुडघ्यात दुमडा आणि गुडघे छाती जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आता गुडघे हलके छातीवर दाबा आणि डोके जमिनीपासून वर उचलून हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आसनावेळी श्वासच्छोवास नेहमीप्रमाणे घ्या.

योगा yoga
योगा yoga

​भुजंगासन

पाठ, पोट, कंबरचे दुखणे कमी करण्यासाठी आणि अतिरिक्त फॅट कमी करण्यासाठी दिवसातून एकदा का होईना भुजंगासन करावे.
प्रथम छातीवर झोपावे. दोन्ही पाय जोडून घ्यावे. हात मांडीजवळ जमिनिला टेकवून ठेवावे. कपाळ जमिनीवर ठेवावे. आता हळूहळू हात छातीजवळ आणावे, आणि डोके वर उचलत नागाच्या फणीप्रमाणे पोज करावी.

 

Back to top button