Control Anger : तुम्‍हाला रागावर नियंत्रण मिळवायचंय? फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स | पुढारी

Control Anger : तुम्‍हाला रागावर नियंत्रण मिळवायचंय? फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

राग येणे ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे; पण आजकाल असं म्हटलं जातंय की, एकंदरच रागाचे प्रमाण वाढले आहे. अर्थात राग येणे हे वाईट किंवा चुकीचे नाही, पण अति राग हा मात्र आरोग्यासाठी घातकच!

रागावर आपण जर नियंत्रण मिळवले तर ते चांगले आहे, जर आपण रागावर नियंत्रण नाही मिळवले तर आपल्या समस्या वाढण्याचीच शक्यता जास्त; मग त्या समस्या शारीरिक असोत, मानसिक असोत वा सामाजिक. अति रागामुळे काहीच उमगत नाही आणि रागाच्या भरात आपण काहीही करून बसण्याची शक्यता दुणावते. यामध्‍ये आपले स्वतःचे जास्त नुकसान होते. ( Control Anger )

रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढतो, शरीर-मनावरचा ताण वाढतो. अर्थात हे रागाचे प्रारंभिक परिणाम आहेत. रागाचा केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर आपल्या कामाच्या व आयुष्याच्या गुणवत्तेवरदेखील प्रभाव पडतो हे समजून घेणे आणि रागावर नियंत्रण मिळवण्याची गरज ओळखणे महत्त्वाचे आहे.

Anger control रागाचे शरीरावर हाेणारे दुष्‍परिणाम

रागामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते. आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्वचेचे आजार जडतात, अनिद्रा, पचनासंबंधीच्या समस्या उद्भवतात, चिंता वाढते, डोकेदुखी, उच्चरक्तदाब, नकारात्मक भावना निर्माण होतात. राग आपली विचार करण्याची शक्ती कमी करतो. अशावेळी स्वतःची चूक असली तरी माणूस ती मानायला तयार नसतो. तो नेहमी दुसर्‍याची चूक शोधत असतो, यामुळे अजून राग येतो.

रागाचे हे दुष्परिणाम अनेकांनी अनुभवलेले असल्या कारणाने बहुतेकांना रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हे जाणून घ्यायचे असते. त्यांनी खालील टीप्‍स फॉलो केल्‍यास फायदा हाेईल.

  • जेव्हा राग येतो तेव्हा प्रथम आपल्या मनावर नियंत्रण मिळवा. जर आपले आपल्या मनावर नियंत्रण असेल तर आपल्याला राग येणार नाही. प्राणायाम मनातील बेचैनी कमी करण्यास मदत करतो. नियमित प्राणायाम करा.
  •  जेव्हा आपले मन शांत व स्थिर असते तेव्हा आपण क्रोधीत होण्याची शक्यता कमी होते.
  •  जेव्हा आपल्याला खूप राग येईल तेव्हा मोठा (दीर्घ श्‍वास) घ्या व सोडा. जर आपण काही वेळासाठी असे केलेत तर आपला राग कमी होईल.
  • शक्य झाल्यास राग येऊ पाहात असताना आपले डोळे बंद करा व मोठा श्वास घ्या. आपल्या मनात काय चाललेय त्याकडे लक्ष द्या. आपल्याला माहीत असेल की, श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास तणाव दूर होण्यास मदत मिळते आणि मन शांत होते.
  • जर आपल्याला रात्री नीट झोप लागत नसेल तर अनिद्रा हेदेखील राग येण्याचे कारण असू शकते. म्हणून दररोज 8 तास झोपणे जरूरी आहे. यामुळे आपले मन व शरीर दोहोंना आराम मिळेल आणि आपली बेचैनी कमी होईल.
  •  ध्यान करा, प्राणायामाचा नियमित अभ्यास करा, संतुलित आहार घ्या. या त्रिसूत्रीचा आपल्याला अति रागावर नियंत्रण मिळवण्यास उपयोग होईल.
डॉ. संतोष काळे 

 

हेही वाचा : 

 

 

Back to top button