बीसीएए आणि कॅलरीजचे ज्वलन | पुढारी | पुढारी

बीसीएए आणि कॅलरीजचे ज्वलन | पुढारी

मयुरा अ. जाधव, वाचस्पतीविधिज्ञ

कलहान्तनि हम्य्राणि कुवाक्यानां च सौहृदम् ।कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मांन्तम् यशो नृशाम्॥(भतृहरि 18) अर्थात, भांडणामुळे परिवार तुटतात. चुकीच्या शब्द प्रयोगाने दोस्त गमावतात. बुद्धीहीन असमर्थ शासकामुळे राष्ट्र नाश पावते. वाईट काम केल्याने यश मिळत नाही. जसे की वाईट कामाचा कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहतो.

मुंबई बांद्रा येथे सेलिब्रेटी जिम्स आहेत. द्विमासिक कपल पॅकेजसोबत चार प्रमोशनल सेशन फ्री मिळाले. हिरॉईन बघायला मिळणार म्हणून निशा माझ्यासोबत आली. एक मॉडेल वर्कआऊट करत होती. निशाने ओळख काढण्यासाठी तिला विचारले,‘तुम्ही कसले रंगीत पाणी पिता?’ मॉडेलने रागाने तिला फटकारले,‘व्हॉट पानी? यू डोन्ट नो अबाऊट बीसीएए! तर जिमला कशाला येता?’ ‘सॉरी मॅडम!’ असे ओशाळवाणे म्हणत निशाने स्वत:च्या अज्ञानाला कोसले. मी निशाला सांगितले, तुझा प्रश्‍न बरोबर होता; पण विचारण्याच्या पद्धतीतील शब्द, वेळ आणि व्यक्‍ती चुकीची होती. आहार व सप्लिमेंटची माहिती देण्यासाठी डाएटिशन आणि व्यायाम करवून घेण्यासाठी ट्रेनर जिमने नेमलेले आहेत. अनोळखी लोकांपासून सावध राहावे. मूर्खांशी बोलू नये, त्यांची संख्या एकाने वाढते  असे शास्त्रवचन आहे. लोक त्रास देतात आणि बदनाम मात्र सेलिबे्रटी होतात.

पूरक आहाराची (सप्लिमेंट) जरूरी का पडते? :- 

ज्वारी, गहूसारखी धान्ये, तूरडाळ, मूगदाळ इ. डाळी, भाजीपाला, फळे, मासे, शिंपल्यासारखे पाण्यातील जीव, चिकन, मटणसारखे मांसाहार, बटाटा, बीटसारखे भूमिगत खाद्यपदार्थ आणि शुद्ध पाणी इ. मनुष्याचा मूळ आहार. समजा, आपण परीक्षेला बसलो तर आपल्याला मुख्य पुरवणी मिळते. फक्‍त मुख्य पुरवणी इतपत लिखाण केल्यास आपण प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होतो. परंतु, जे विद्यार्थी डिस्टिक्शनमध्ये पास होतात ते एक अतिरिक्‍त पुरवणी घेऊन लिखाण करतात. जे विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत येतात ते अनेक अतिरिक्‍त पुरवण्यांचा वापर लिखाण करण्यासाठी करतात. शेवटी तुम्ही किती अभ्यास केला यापेक्षा तुम्हाला किती गुण मिळाले, यावर तुमचे भवितव्य ठरते, अशीच सध्याची शिक्षण पद्धती आहे.  ज्ञान ग्रहण करण्यासाठी आयुष्य सुद्धा कमी पडते. समजा, मुख्य पुरवणी बाजूला ठेऊन फक्‍त अतिरिक्‍त पुरवणीच्या आधारे गुणमूल्यांकन केले तर कोणीच उत्तीर्ण होणार नाही. त्यामुळे मुख्य पुरवणी असलेला नैसर्गिक आहार प्रथम क्रमांकावर आहे. जिभेच्या अग्रावरती चव समजते हे माहीत असूनसुद्धा मनुष्य हा जिभेचा गुलाम आहे. जीभ ही चवीची गुलाम आहे. आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या सहा चवींनी उत्कृ ष्ट आहार बनतो. मनुष्य गोड पदार्थांचे जास्त सेवन करतो, पर्यायाने मधुमेह रोगींची संख्या वाढते.  

मनुष्याच्या आवडीच्या पदार्थांची संख्या नावडीच्या पदार्थापेक्षा कमी आहे. अशाने शरीराला संतुलित आहार मिळत नाही. आहारातून पोषणमूल्ये अपूर्ण राहिली आणि तुमचे ध्येय उच्च असेल तरच ओरिजनल सप्लिमेंटचा वापर करावा. आहार हा चावून खावा लागतो आणि औषध हे गिळावे लागते. आम्हाला बीपीची, मधुमेहाची गोळी रोज घ्यावी लागते हे लोक अभिमानाने सांगतात; पण सर्व औषधे बंद करायला लावणारा व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्याची कारणे देतात. त्या लोकांसाठी हबीब जालिब यांचा शेर आहे. तुमसे पहले वो जो इक शख्स यहाँ  तख्तनशीं था । उसको भी अपने खुदा होने पे इतना ही यकीं था ॥ 

त्या परमेश्‍वराने निर्माण केलेला षड्र्सयुक्‍त नैसर्गिक  आहार खा. 

ब्रँच्ड चेन अमिनो अ‍ॅसिड चे शरीरातील योगदान :-

नऊ इसेन्शिअल आणि बारा नॉन इसेन्शिअल अमिनो अ‍ॅसिडपासून संपूर्ण प्रोटिन बनते. इसेन्शिअल अमिनो अ‍ॅसिड मानवी शरीरामध्ये निर्माण होत नाही. ते भोजन किंवा सप्लिमेंटद्वारे आपल्याला घ्यावे लागते. नॉन इसेन्शिअल अमिनो अ‍ॅसिड मानवी शरीर स्वत: बनविते. त्यामुळे भोजन किंवा सप्लिमेंटद्वारे ते घेतले जाण्याची काही गरज नाही. जर तुम्ही अ‍ॅथलिट आहात किंवा जिममध्ये वर्कआऊट करत असाल तर तुम्हाला अधिक मात्रेत अमिनो अ‍ॅसिड पाहिजे. जेव्हा आपण प्रोटिन घेतो तेव्हा ते अमिनो अ‍ॅसिडच्या रूपातच शरीरमध्ये तुटते व रूपांतरीत होते.   

बीसीएए आजच्या युगातील लोकप्रिय मसल्स सप्लिमेंट आहे. ब्रँच्ड चेन अमिनो अ‍ॅसिडच्या ग्रुपला ‘बीसीएए’ म्हणतात. ज्यामध्ये ल्युसीन, आयसोेल्यूसीन आणि व्हॅलीन हे तीन अमिनो अ‍ॅसिड 2:1:1 या आदर्श प्रमाणात असतात. यातील ल्युसीन सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे. जे शरीरामध्ये पोहोचताच सरळ प्रोटिन सिंथेसिस प्रक्रियेस सुरुवात करते. त्यामुळे शरीराला लगेच प्रोटिन मिळण्यास सुरुवात होते. हे कोशिकांच्या विकासासाठी आवश्यक इंझाइममध्ये वृद्धी करते. आयसोल्यूसिन स्नायू पेशीतील मेटाबॉलिझम आणि ग्लुकोजचा स्तर वाढविते.ज्यामुळे व्यायाम करताना शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्‍त होते. व्हॅलीनवरील दोन अ‍ॅसिडपेक्षा कमी भूमिका आदा करते. ते प्रोटिन सिंथेसिस प्रक्रियेला चालना देते. रेजिस्टंन्स ट्रेनिंगमध्ये बीसीएए घेतल्याने स्नायूपेशींच्या विकासासाठी जरूरी मेम्मेलियन टार्गेट ऑफ रॅपामायसिन कॉम्प्लेक्स वाढविते. ते कॅटाबॉलिझम प्रक्रियेला मंद करते आणि मसल्स गेन करते. यामध्ये असलेले कॅफिन आपली ऊर्जा वाढवते. ट्रिप्टोफॅन थकावट जाणवू देत नाही. त्यामुळे वर्कआऊटचे बेहतर प्रदर्शन होते. जिम बॅगमध्ये बीसीएए कॉमन असते. 

व्यायामात कॅलरी कशा व केव्हा जळतात :-

व्यायामात पहिल्या पंधरा मिनिटांत शरीरातील ग्लुकोज जळते. त्यानंतर शरीर जाते प्रिवर्क आऊट झोनमध्ये. अर्धा तासानंतर शरीर घामाने भिजते आणि चरबी ज्वलनास सुरुवात होते. मिनिटाला आठ कॅलरीज जळणे इतका वेग व्यायाम करताना हवा. त्यानंतर मसल्स ब्रेकडाऊन सुरू होतात. जर तुम्ही एक तासापेक्षा जास्त व्यायाम करत असाल तेव्हा एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला वजन उचलणे अवघड जाते. जर तुम्ही बायसेप्समारत असाल तर डंबेल्स वेट अपर पोझिशनला स्थिर न राहता त्वरित खाली जाते ही शरीराची मसल्स ब्रेकडाऊन स्थिती असते. यावेळी क्रियाशील स्त्रिया, अभिनेत्री व्यायाम करण्यापूर्वी बीसीएए सप्लिमेंट पाण्यातून घेतात. यामुळे दुखापत होण्याच्या प्रमाणात घट होते. स्नायू आखडणे, मसल्स स्टे्रनसारख्या किरकोळ दुखापती दुरुस्त होण्यास मदत होते. परफॉर्मन्स वाढल्याने लार्ज वेट विथ मेनी रिपिटेशन्स केली जातात. यामुळे फॅट न वाढता मसल्स वाढून त्या स्लीम अँड ट्रीम दिसतात. देखण्या आणि सुडौल दिसल्याने त्या चित्रपटातील भूमिकेला न्याय देतात. आय डोन्ट वॉन्ट यूवर आर्ग्युमेंट अ‍ॅन्ड रिझन्स, आय वॉन्ट ओन्ली रिझल्ट! हा रोकड अनुभव जगात चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध होते.  

बीसीएए केव्हा घेतात आणि कशात मिळते?:-

रात्री नऊ तास पोट रिकामे असते. म्हणून सकाळी व्यायामाच्या आधी 5.5 ग्रॅम बीसीएए पाण्यातून पितात. त्यामुळे शरीरातील मांसपेशी वाढीस लागतात. आपण व्यायाम करतो त्यावेळी शरीर कॅटाबोलिक स्टेटमध्ये असते. ते मांसपेशीतील प्रोटिनपासून एनर्जी मिळविते आणि मसल्स लॉस होतो त्याचे प्रमाण बीसीएए कमी करते. इंटेन्स वर्कआऊट झाल्यानंतर व्हे प्रोटिन पितात. व्हे प्रोटिनमध्ये याचे प्रमाण 2.75 ग्रॅम ल्युसीन, 1.38 ग्रॅम आयसोेल्युसिन, 1.37 ग्रॅम व्हॅलीन असे एकूण 5.5 ग्रॅम आदर्श प्रमाण असते. जे आपल्याला अ‍ॅनाबोलिक स्टेटमध्ये मसल्स रिकव्हर, रिगु्रप करण्यास मदत करते. शरीराला असलेली दिक्‍कत, झीज भरून काढते. बीसीएएचे तिन्ही प्रकार चिकन ब्रेस्ट, मटण, अंडी या मांसाहारी पदार्थातून मिळतात. तसेच चीज, पनीर, दही सारख्या दुग्धजन्य उत्पादनाच्या सेवनातून प्राप्‍त होतात. डाळी, भाज्या आणि फळे यात अल्पप्रमाणात बीसीएए असते. यातून गरज भागविण्यासाठी खूप जास्त कॅलरीज सेवन करणे जरूरी आहे. व्हिटॅमिन ‘बी’ बीसीएए च्या इंझाइम उत्पादनासाठी जरूरी असते. तसेच ते   पचविण्यासाठी ‘ब 6’ जीवनसत्त्वे खास करून शरीर वापरते.  बेहतर परिणामांसाठी जिममध्ये ट्रेनिंग घेणे व डॉक्टरांचे सप्लिमेंट खुराक मार्गदर्शन आवश्यक आहे. लर्न फ्रॉम येस्टरडे, लिव्ह फॉर टूडे, होप फॉर टुमारो. द इम्पॉर्टंट थिंग इज नॉट टू स्टॉप क्‍वेश्‍चनिंग…!!!

 

Back to top button