पित्ताचा त्रास आणि नियंत्रण | पुढारी | पुढारी

पित्ताचा त्रास आणि नियंत्रण | पुढारी

मेघना ठक्‍कर

पित्त झाले की मळमळ, उलटी, छातीत जळजळ सुरू होते. काहीकाही वेळा छातीत दुखूही लागते.  अगदी हार्टअ‍ॅटॅक आला की काय असे वाटू लागते. इतका भीतीदायक पित्ताचा त्रास होतो.  पित्त किंवा अ‍ॅसिडिटी ही आजकाल अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही होताना दिसते. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्‍त पदार्थांचे, तळक पदार्थांचे सेवन करण्याकडे वाढलेली प्रवृत्ती, झोपेच्या बदललेल्या वेळा यामुळे पित्ताचे विकारही वाढले आहेत. पित्तावर आजकाल  बाजारात अनेक अ‍ॅसिडीटीच्या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. मात्र, वारंवार या गोळ्या घेणे एकंदर प्रकृतीच्या द‍ृष्टीने चांगले नाही. त्यामुळे पित्त होत असेल तर घरच्या घरीच काही रोजच्या वापरातले पदार्थ वापरूनही त्यावर नियंत्रण मिळविता येते.

आजकाल पित्ताचा त्रासही बर्‍याच जणांना सतावत असतो. त्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या बाजारात आहेत. पण, घरगुती उपचारात एक चतुर्थांश चमचा जेष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने पित्ताचा त्रास कमी होतो. आमसूल सरबत प्यायल्यानेही पित्त कमी होते.

गार वारे लागल्यामुळे अंगावर येणार्‍या पित्ताला शैतपित्त म्हणतात. या पित्तावर खायचा सोडा कोरडाच अंगाला लावून अर्ध्या तासाने आंघोळ करावी. म्हणजे हा त्रास कमी होतो.

पित्त कमी करण्यासाठी गार केलेले दूध भरपूर साखर घालून थोडे थोडे वारंवार प्यायल्यास पित्तामुळे पोटात अथवा छातीत होणारी जळजळ कमी होते. दूध गारकरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले तरी चालते. 

बाजारात सूतशेखर मात्रा मिळते. पित्तावर ही मात्रा उगाळून दुधातून घेतल्यासही आराम मिळतो.

 

Back to top button