जल जीवन आहे ! | पुढारी | पुढारी

जल जीवन आहे ! | पुढारी

शरीरात पाण्याला फार महत्त्वाची कार्ये पार पाडावयाची असतात. अन्नसत्त्वांचे वाहक म्हणून पाण्याचा उपयोग होतो. शून्य कॅलरीज मूल्य असलेल्या एचटूओमुळेच शरीराच्या सर्व भागांना अन्नाचा पुरवठा होतो. नत्राम्ले, स्निग्धे, क्षार आणि जीवनसत्त्वे द्रावाच्या रूपात आतड्यातील आवरणातून रक्तावाटे व रसावाटे सर्व पेशींना पुरविली जातात. पेशीत याचा विनियोग होतो व निरूपयोगी पदार्थांचा उत्सर्ग होतो. 

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् । भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्॥(अपा सुक्तम्, ऋग्वेद 10.9)अर्थात, शुद्धजल अजीर्ण व अपचनमध्ये  गुणकारी आहे. पाचनानंतर एक तासाने उदक पौष्टिक व शक्ती प्रदान करणारे आहे. अन्नादरम्यान घोटभर पाणी मोहक अमृततुल्य आहे. जेवणानंतर लगेच पाणी प्याल्यास ते पचनक्रियेसाठी सहायक जठराग्नी व गरम पाचकरस  थंड  करते. त्यामुळे अन्नाचे पचन होण्याऐवजी ते सडून गॅस बनू लागतो. वारंवार अन्न न पचल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल व यूरिक अ‍ॅसिडची मात्रा वाढते. अ‍ॅसिडीटी वाढून डोके दुखते. जल आणि अग्नी परस्परविरोधी पंचमहातत्त्वे असल्याने त्याचा हा दुष्परिणाम विषसमान आहे. जलाशिवाय जीवनाची कल्पनाही करवत नाही. प्रत्येक  मनुष्य, प्राणी, पक्षी, जलचर, सरीश्रृप जीव, किडे इत्यादी सजीवांना तसेच वृक्ष, वेली यांचे जीवनात जल महत्त्वाचे आहे. म्हणून म्हणतात‘जल ही जीवन है’।

आपल्या वजनाच्या दोन तृतीयांश भाग पाणी आहे. या पाण्यापैकी एक्काहत्तर टक्के भाग पेशीत असतो व सात टक्के रक्तद्रावात असतो. याशिवाय दोन पेशीजालांमध्ये असलेल्या जागेत व संयोगी पेशीजालात असलेल्या जागेत बावीस टक्केपाणी असते. बाल्यावस्था, कौमार्य, तारुण्यावस्था इ.सर्व वाढीच्या अवस्थेत पाणी जास्त लागते. शरीरातील सर्वात कार्यक्षम असे जे पेशीजाल असतात त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. असे पेशीजाल म्हणजे रक्त, हृदय, फुफ्फुसे, स्नायू आणि मूत्रपिंड ही होत. शरीरातील जवळजवळ सर्व ग्लायकोजेन व चरबी नष्ट झाली तरी मनुष्य काही काळ जगू शकतो; पण शरीरातील दहा टक्के पाणी नष्ट झाले तर परिस्थिती गंभीर होते. बावीस टक्के पाणी नष्ट झाल्यास मृत्यू अटळ आहे. पाण्यापेक्षाही प्राणवायूची गरज शरीराला अधिक असते. मानवी हाडे ही सक्त व कठीण असतात तरीसुद्धा त्यामध्ये एकतीस टक्के पाणी असते.

पाण्याची शरीरांतर्गत कार्ये :

 शरीरात पाण्याला फार महत्त्वाची कार्ये पार पाडावयाची असतात. अन्नसत्त्वांचे वाहक म्हणून पाण्याचा उपयोग होतो. शून्य कॅलरीज मूल्य असलेल्या एचटूओमुळेच शरीराच्या सर्व भागांना अन्नाचा पुरवठा होतो. नत्राम्ले, स्निग्धे, क्षार आणि जीवनसत्त्वे द्रावाच्या रूपात आतड्यातील आवरणातून रक्तावाटे व रसावाटे सर्व पेशींना पुरविली जातात. पेशीत याचा विनियोग होतो व निरूपयोगी पदार्थांचा उत्सर्ग होतो. कर्ब व प्राणवायू याच पद्धतीने संबंध शरीरात पुरविले जातात व बाहेर टाकले जातात. सर्व अन्नपदार्थांचे अभिशोषण झाल्यावर हा द्राव अन्ननलिकेत येतो व मग पाचक रस याच्या वाहकाचे काम करतात. मानवी देहात चोवीस तासांत पुढील प्रमाणात विविध रस निर्माण होतात. लाळ- 500 ते 1500 सी.सी., जाठर रस-1000 ते 2500 सी.सी., पित्त रस-100 ते 400सी.सी., आंत्ररस -700 ते 3000 सी.सी.पाण्याचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे शरीराचे उष्णतामान समतोल राखणे. पाणी हे अतिशय कार्यक्षम उष्णतावाहक आहे. शरीरात तयार होणारी फाजील उष्णता त्वचेच्या पृष्ठभागावर होणार्‍या बाष्पीभवनामुळे शरीराबाहेर टाकली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा अतिश्रमाचा व्यायाम केल्यास अधिक घाम येण्याचे हे मुख्य कारण होय. पाण्याचे तिसरे कार्य म्हणजे शरीरातील विविध अवयवांचे रक्षण करणे. बाहेरील आघात, शॉक्स् टाळण्यासाठी पाण्याचा उशीसारखा उपयोग होतो.प्रत्येक सांध्यात सायनोव्हिल द्राव असतो. त्याचा वंगणासारखा उपयोग होऊन सांधे ओले राहतात व एकमेकांत घर्षण होत नाही. मध्यवर्ती मज्जासंस्था ही तर सेरिब्रो स्पाईनल फ्ल्युईड मध्येच बुडालेली असते. त्यामुळे तिला सहसा धक्का पोहोचत नाही.

 शरीरातील पाणी उत्सर्गाचे प्रकार : 

शरीराबाहेर पाणी अनेक मार्गाने टाकले जाते. मूत्रपिंड मूत्रावाटे जास्तीत जास्त पाणी बाहेर टाकते. स्वाम्बू चिकित्सेत स्वमूत्र हे औषधीसमान आहे. त्याच्या प्राशनाने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असा त्यांचा दावा आहे. फुफ्फुसे वाफेच्या स्वरूपात उच्छ्वासाबरोबर पाणी बाहेर टाकतात. स्वच्छ पाटीवर तोंडाची वाफ सोडल्यास ही गोष्ट चटकन प्रत्ययाला येते. त्वचेतून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर टाकले जाते.डोळ्यातून, थुंकीतून तसेच नाक शिंकरताना अल्प पाण्याचे उत्सर्जन होते.

पाण्याचे शरीराला पुरवठा प्रमाणाचे लाभ :

 शरीराबाहेर दरदिवशी जाणार्‍या पाण्याची भरपाई पुढीलप्रमाणे होते. आपल्या आहारातील द्रवपदार्थ पाणी, चहा, सरबत इ. पेयांचा यात समावेश असतो. आहारांतील घनपदार्थातसुद्धा पाच ते पन्नास टक्क्यांपर्यंत पाणी असते. याशिवाय आपले शरीर पाणी तयार करते. कारण ज्यावेळी अन्नाचे ज्वलन, ऑक्सिडेशन होते त्यावेळी तयार होणार्‍या अंतिम पदार्थातील एक पदार्थ पाणी असतोच. या पाण्याला चयापचयनाचे जल ‘मेटाबॉलिक वॉटर’असे म्हणतात. हे प्रमाण दर दिवशी सोळा औंस एवढे असते. अतिप्रमाणात पाणी प्यायल्यास मूत्रपिंडावर ताण पडतो. उन्हाळ्यात कितीही गरमी जाणवत असली तरी बर्फाचे पाणी, अतिथंड पाणी पिणे टाळावे. त्यावेळी सामान्य तापमानाचे किंवा हलके थंड पाणी प्यावे.थंड पाण्यामुळे अपचन, कब्ज, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. फार थंड पाणी, पेये प्याल्यास पचनक्रिया मंदावते. जठराला थंड पाणी पचविण्यासाठी ते कोमट तापमानाला आणावे लागते. त्यासाठी अतिरिक्त शक्ती व ऊर्जा खर्च करावी लागते. प्रतिदिन सव्वातीन लिटर कोमट पाणी पिणे आरोग्यदायी असते. यामुळे तुम्ही सडपातळ राहता. जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर तुमचे शरीर डिहायड्रेट असते. शुभ्र लघवी तुम्ही योग्य मात्रेत पाणी प्राशन करता, तुमचे शरीर हायड्रेट असल्याचे निदर्शक आहे. तीनशे मिली पाणी एकावेळी लाभकारक असते. पाणी पिताना तोंडात घोळवून घोटघोट प्राशन करावे. बसलेल्या स्थितीत असे पाणी पिल्याने तोंडातील लाळ पाण्याबरोबर पोटात जाते आणि अन्नपचनाला मदत करते. पाणी पिताना पेल्याला तोंड लावून पाणी पिणे जसे की लहान बाळ स्तनपान करते.  त्यामुळे शरीराचा पीएच लेवल नियंत्रणात राहतो. पोटातील आम्लांना पाणी शांत करते. पोटावर चरबीचे थर जमा होत नाहीत. उभे राहून किंवा चालत पाणी प्याल्यास अनेक प्रकारचे गॅस पोटात पाण्यामध्ये मिसळून वेगाने प्रवेश करतात. त्यामुळे शरीरातील अनहोनी अंगात दबाव आणि खिचाव निर्माण होतो तसेच पाणी मूत्रावाटे शरीराचे नुकसान करत त्वरित आले तसे निघून जाते. त्यामुळे शरीरातील नसा  व संरक्षण व्यवस्था कमजोर होते. गॅसची मात्रा वाढून गुडगेदुखी, कंबरदुखी यासारखे संधीवात होण्याचे प्रमाण वाढते. सूर्य आकाशात असताना पाणी पिण्यामध्ये किमान एक तासाचे अंतर असावे. सूर्यप्रकाशातजास्त प्रमाणात पंचाऐंशी टक्के पाणी प्यावे.सूर्याचा अस्त होऊन अंधार पडल्यावर कमी प्रमाणात पंधरा टक्के पाणी प्यावे. मानवी शरीर रचनेनुसार सूर्यप्रकाशात पाणी लवकर पचते तर चंद्रप्रकाशात पाणी वेळाने पचते. सकाळी सूर्योदयापूर्वी साडेपाच वाजता पाऊण लिटर उष्ण पाण्यात लिंबू , दुधी भोपळा, गव्हांकूर एकदिवस आडघालून पिणे हा अपवाद आहे.उपाशी पोटी उष्णोदक प्राशन केल्याने आतड्यांना चिकटणार्‍या चपातीतील ग्लुटिन व जेवणातील तेलाची, तुपाची सफाई होते. पहाटे दात घासण्यापूर्वी व चूळ भरण्यापूर्वी जलपान केल्याने रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ जठरात पोहोचते. आयुर्वेदानुसार ही प्रात:समयीची लाळ अमृतरसायन समान औषधी असते.ती जठराचे व पाचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. स्थळ, वेळ, काळ, प्रमाण, वय, पद्धत, स्त्री-पुरुष यानुसार जलपानाचे फायदे व तोटे शरीराला अनुभवायला मिळतात. जलपानाचे नियम पाळा आणि निरामय आरोग्य जगा! सर्व समस्यांचे निराकारण मला पाण्यासारखे वाटते कारण शुद्ध पाणी हे जगातील पहिले आणि महत्त्वाचे मूळ नैसर्गिक औषध आहे. आय फिल लाईक वॉटर सॉल्व्ह ऑल प्रॉब्लेम्स बिकॉज प्युअर वॉटर इज द वर्ल्डस् फर्स्ट अँड फॉरमोस्ट नॅचरल मेडिसिन…!!!

Back to top button