यवतमाळमध्ये नवीन ८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ७ जण तबलिगी जमातशी संबंधित | पुढारी

यवतमाळमध्ये नवीन ८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ७ जण तबलिगी जमातशी संबंधित

नागपूर : विशेष प्रतिनिधी

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी सात जण दुस-या राज्यातील असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. सात जणांपैकी चार उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तबलिगी जमातशी निगडीत आहेत. तर पॉझिटिव्ह असलेला आठवा व्यक्ति या सात जणांच्या संपर्कात आला होता.

वाचा : अकोल्यातील ‘तो’ परिसर केला सील

संबंधित बातम्या

विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एकूण ६५ जण भरती आहेत. यापैकी ५१ जणांचे रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. १४ जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी ४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकाच्या घराशेजारील भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.

वाचा : मरकजहून परतलेल्यांनी माहिती द्यावी’

जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या ८९ एवढी आहे.

 

Back to top button