हिंगोली : परभणी क्वॉरंटाईन सेंटरमधून पळालेल्या ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी पकडले | पुढारी

हिंगोली : परभणी क्वॉरंटाईन सेंटरमधून पळालेल्या 'त्या' व्यक्तीला पोलिसांनी पकडले

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

परभणी येथील शासकीय क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती असलेला एक इसम पळून बुधवारी हिंगोलीकडे येत होता. हट्टा पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली असून सदर व्यक्तीला पुन्हा परभणी येथील आरोग्य यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे.

अधिक वाचा : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

संबंधित बातम्या

बाहेर राज्यातून परभणीत दाखल झालेल्या एका व्यक्तीला आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून परभणी येथील शासकीय क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले होते. मात्र हा व्यक्ती (दि.८ एप्रिल) तिथून पळ काढून हिंगोलीकडे पायी येत होता. याबाबत हट्टा पोलिसांना संशय आल्याने त्याची विचारपूस केली. तर तो व्यक्ती परभणी येथून पळाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला आडगाव शिवारात एका झाडाखाली थांबवून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. क्वॉरंटाईन सेंटरमधून पळ काढला असल्याने हट्टा पोलिसांनी त्या व्यक्तीला तब्बल तीन तास गोल रिंगण करून नजरकैदेत ठेवले. त्यानंतर परभणी पोलिस व वैद्यकीय पथकाने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेच्या मार्फत परभणीला नेले. 

अधिक वाचा : सोलापुरातील कामगारास कोरोनाची लागण

ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व पोह शेळके, राजेश वळसे, गणेश लेकुळे, पावन झंझाड यांनी केले आहे.

अधिक वाचा : औरंगाबादेत आणखी तिघांना कोरोना 

Back to top button