अद्भुत प्राणी जगत! : सेमोरिआ | पुढारी

अद्भुत प्राणी जगत! : सेमोरिआ

पर्मियन युगाच्या प्रारंभी सेमोरिआ हा प्राणी उत्तर अमेरिका व युरोप खंडात वावरत होता. आदी सरिसृप वर्गातील हा प्राणी पाण्यात व जमिनीवर राहू शकत होता. लांबलचक, मजबूत पाय, कोरडी त्वचा यामुळे प्रतिकूल उष्ण तपमान असलेल्या पर्मियन कालखंडात केवळ दोन फूट असलेला हा प्राणी टिकाव धरू शकला. कीटक, छोटे उभयचर प्राणी, सरिसृपांची अंडी हा याचा मुख्य आहार होता.
या प्राण्याचे जीवाश्म प्रथम अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सेमोर गावात सापडले. या गावाच्या नावावरूनच या प्राण्याला सेमोरिआ नाव पडले. यानंतर अमेरिका व जर्मनीतील अनेक ठिकाणी या प्राण्याचे जीवाश्म आढळले. सुमारे 28 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील हा आदी सरिसृप पर्मियन युगाच्या उत्तरार्धात नष्ट झाला.
 

Back to top button