भारत दर्शन : डॉ. वसुधा आपटे | पुढारी

भारत दर्शन : डॉ. वसुधा आपटे

महाराष्ट्रातील पहिल्या न्यायवैद्यक शास्त्रतज्ज्ञ महिला व डेप्युटी कॉरोनॉर म्हणून भारतातील पहिल्या महिला तज्ज्ञ अशी डॉ. वसुधा आपटे यांची दुहेरी ओळख आहे.
1970 च्या दशकात न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स एक व्यवसाय म्हणून स्वीकारणे एखाद्या स्त्रीसाठी मोठे आवाहन होते. मात्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. वसुधा आपटे यांनी हे आवाहन स्वीकारले.

मुंबईचे नायर रुग्णालय, टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय, सूरत येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेचा फॉरेन्सिक मेडिसीन विभागाच्या प्रमुख पदावर त्यांनी कार्य केले आहे. 
एम.बी.बी.एस, एम.डी. व एल.एल.बी अशा पदव्या प्राप्त केलेल्या डॉ. वसुधा आपटे यांना ‘वुमन ऑफ द इयर’, ‘वुमन ऑफ द डेकेड’, ‘वुमन ऑफ द मिलेनिअम’, ‘न्यायवैद्यक चिकित्सारत्न’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button