आशियातील सर्वात मोठे चर्च भारत | पुढारी

आशियातील सर्वात मोठे चर्च भारत

दर्शन

के वळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठे चर्च म्हणून मान्यता मिळालेल्या सुमी बाप्टिस्ट चर्चचे बांधकाम पूर्ण झाले असून नुकतेच ते सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागालॅण्डमधील झुन्हेबोटो येथे बांधण्यात आलेले हे चर्च समुद्रसपाटीपासून सुमारे 1865 मीटर उंचीवर आहे. या चर्चचे क्षेत्रफळ 23,73,346 चौरस मीटर एवढे विशाल आहे. हे विशाल चर्च बांधण्यासाठी सुमारे दहा वर्षे लागली व एकूण 36 कोटी रुपये एवढा खर्च आला.

या भव्य चर्चमध्ये एका वेळेस सुमारे 85,000 भाविक बसू शकतात. चर्चमध्ये एकूण 27 खोल्या आजारी व्यक्‍तीच्या सुश्रूषेसाठी आहेत. याशिवाय विवाह सोहळ्यातील वधू-वरांसाठी विशेष खोल्या, कॅफेटेरिया कार्यालये, कॉन्फरन्सिंग रूम्स, प्रशिक्षण वर्ग आदी येथे अनेक सुविधा आहेत. चर्चची लांबी 203 फूट, रुंदी 153 फूट व उंची 166 फूट आहे. नयनरम्य श्ाुभ्र व निळ्या रंगांत रंगवलेल्या या चर्चमधील चर्चबेल सुमारे पाचशे किलो वजनाची आहे. पोलंडमधून आयात केलेली ही घंटा 93 टक्के पितळ व 7 टक्के टिनची बनली आहे. घंटेचा आवाज सुमारे दीड कि.मी. परिसराच्या परिघात ऐकला जाऊ शकतो.  या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागालँडमधील हे सुमी बाप्टिस्ट पंथाचे हे एकमेव चर्च आहे.
 

संबंधित बातम्या

Back to top button