भारतातील सर्वोत्तम पोलिस स्थानक | पुढारी | पुढारी

भारतातील सर्वोत्तम पोलिस स्थानक | पुढारी

भारत दर्शन

भ रत सरकारच्या गृह मंत्रालयाने ‘स्मार्ट पोलिस स्थानक’ उपक्रमांतर्गत देशातील सर्वोत्तम पोलिस स्थानकाचा मान तामिळनाडूच्या कोइंबतूर शहरातील आर. एस. पूरम पोलिस स्थानकाला नुकताच दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2014 च्या पोलिस महासंचालक व  पोलिस महानिरीक्षकांच्या राष्ट्रव्यापी परिषदेत स्मार्ट पोलिस स्थानकाची कल्पना मांडली होती. सेन्सेटिव्ह-स्ट्रिक्ट, मॉडर्न विथ मोबिलीटी, अलर्ट-अकाउंटेबल, रिलायबल-रिस्पॉन्सिव्ह, ट्रेनड् व टेक्नोसॅव्ही पोलिस असलेल्या स्थानकांना पुरस्कार देण्याची ही योजना आहे. आर. एस. पूरम पोलिस स्थानक या सर्व निकषांवर खरे उतरले.

या पोलिस स्थानकांत स्वच्छ पाण्याची सुविधा, अभ्यागतांसाठी विशेष खोली, प्रतीक्षागृह, स्वागत कक्ष, अपंगांसाठी रॅम्प, महिलांसाठी केवळ महिला पोलिस कर्मचारी असलेली विंग अशा सुविधा असून, स्थानकाची स्वच्छता, गुन्हे उकलण्याचा वेग, पारदर्शक कारभार, नागरिक सुविधा हे इतर निकष ध्यानात घेऊन आर. एस. पूरम पोलिस स्थानकाची निवड सर्वोत्तम पोलिस स्थानक म्हणून करण्यात आली.
 

संबंधित बातम्या

Back to top button