स्टॉप वॉच | पुढारी | पुढारी

स्टॉप वॉच | पुढारी

क्रीडा क्षेत्रात विशेषत: धावण्याच्या स्पर्धेत खेळाडूने अंतिम रेषा केव्हा ओलांडली याचे अचूक मापन करणे गरजेचे असते. स्टॉप वॉचचा शोध लागल्यानंतरच हे शक्य झाले. त्यापूर्वी साध्या घड्याळाच्या आधारे वेळ ठरवली जात असे. पण त्यात केवळ सेकंदापर्यंतच अचूक वेळ मोजता येत असे. 1916 साली टॅग हुअर या कंपनीने मायक्रोग्राफ या स्टॉप वॉचचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. त्याची क्षमता व अचूकता सेकंदाच्या शंभराव्या भागाची नोंद करण्याची होती.

या स्टॉप वॉचमुळे खेळाडूने किती विक्रमी वेळेत धावण्याची किंवा पोहण्याची स्पर्धा जिंकली आहे त्याचे अचूक मापन करता येऊ लागले. 1971 साली अधिक क्षमतेचे स्टॉप वॉच बनविण्यात आले. त्याची क्षमता सेकंदाच्या एक हजार भागाचे मापन करण्याची होती. संगणकाच्या मदतीने आता वेळ अगदी सेकंदाच्या एक लक्षांश भागापर्यंत मोजता येत असली तरी स्टॉप वॉचचे क्रीडा क्षेत्रातील योगदान उल्‍लेखनीय आहे एवढे नक्‍की.

Tags : ankur, Stop watch,

संबंधित बातम्या

Back to top button