बर्फातून संगीत | पुढारी | पुढारी

बर्फातून संगीत | पुढारी


नॉर्वेच्या एका गावात एका भल्यामोठ्या इग्लूमध्ये प्रेक्षक उणे 24 अंश सेल्सिअस तापमानात संगीताचा आनंद लुटायला जमले आहेत. हे प्रेक्षक ज्या वादकांना ऐकायला आले आहेत त्यांना तर अधिकच थंडी वाजत आहे.याचे कारण त्यांची वाद्ये चक्‍क बर्फाची बनलेली आहेत.दरवर्षी नॉर्वेच्या डोंगराळ भागातील फिन्स गावात ‘आईस म्युझिक फेस्टिव्हल’ भरवला जातो.

या महोत्सवात बर्फापासून बनवलेल्या वाद्यांचा वापर केला जातो. गिटार, व्हायोलिन, झायलोफोन, क्लाव्हज व इतर वाद्ये फक्‍त आणि फक्‍त बर्फापासून बनविलेली असतात.अशी वाद्ये वाजवताना कलाकारांचा कस लागतो. याचे कारण वाद्ये जसजशी वाजवली जातात ती उष्णतेने वितळतही जातात. वाद्य वाजविताना मोडण्याचीही भीती असते. तरीही आतापर्यंत 13 आईस म्युझिक फेस्टिव्हल्सचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले असून अनेक देशांतील पर्यटक या अनोख्या संगीत महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

Tags :ankur story ,song in snow

संबंधित बातम्या

Back to top button