अद्भुत प्राणी : डेव्हिल रे | पुढारी

अद्भुत प्राणी : डेव्हिल रे

रे म्हणजेच वाघोळी माशाच्या प्रजातीतील डेव्हिल रे अस्तित्वासाठी झगडणारी माशाची प्रजाती आहे. रे प्रजातीतील हा सर्वात मोठा मासा असून याचा आकार 17 फुटांपर्यंत जातो. मध्य समुद्र, पूर्व अटलांटिक समुद्र, आर्यलँड व पोर्तुगालच्या दक्षिण समुद्रात आढळणारा हा मासा खोल समुद्रात राहणे पसंत करतो. समूहात राहणारा हा मासा कवचधारी जीव व छोट्या माशांची शिकार करतो. या माशाच्या पुनरुत्पादनाचा वेग मंद असल्याने हा मासा कमी प्रमाणात समुद्रात आढळतो. सागरी पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रदूषण व शिकार यामुळेही या माशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

सुमारे दोन ते अडीच कोटी वर्षांपासून डेव्हिल रे समुद्रात वावरत आहेत. डेव्हिल रे असे नाव असले तरी हा मासा माणसांसाठी निरुपद्रवी व थोडासा लाजाळू आहे. कधी कधी डॉल्फिनप्रमाणे हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन हवेत उंच उड्याही मारतो.

संबंधित बातम्या
Back to top button