Diwali Shankarpali : खुसखुशीत, तोंडात विरघळणारी शंकरपाळी कशी कराल? | पुढारी

Diwali Shankarpali : खुसखुशीत, तोंडात विरघळणारी शंकरपाळी कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, घरामध्ये गोडधोड बनवणं आलंच! दिवाळीच्या सणातील एक स्पेशल रेसिपी म्हणजे गोड शंकरपाळी. खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी शंकरपाळी कुणाला आवडणार नाही. दिवाळीच्या सणानिमित्त (Diwali Shankarpali ) महाराष्ट्रातील सण दिवाळीनिमित्त बनवला जाणारा खास पदार्थ ‘शंकरपाळी’ची रेसिपी आपण पाहणार आहोत.  (Diwali Shankarpali )

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: गोड पदार्थ Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Preparing Time

२० minutes

Cooking Time

३० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. एक किलो मैदा

  2. एक वाटी तूप

  3. दोन वाटी पिठी साखर

  4. तेल

  5. दूध

DIRECTION

  1. मध्यम गॅसवर एका भांड्यात दूध आणि पिठीसाखर विरघळण्यासाठी ठेवा. मिश्रण एकजीव झाले की, गॅस लगेच बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.

  2. परातीमध्ये मैदा घ्या आणि गरम केलेले तूप घाला. त्यामुळे शंकरपाळी खुसखुसशीत होते.

  3. मैद्यामध्ये तूप, साखर आणि दूध एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या. नंतर मळलेल्या पिठाला अर्धा तास बाजूला भिजत ठेवा.

  4. आता त्या पीठाचे छोटे-छोटे एकसारखे गोळे करून पोळी लाटून घ्या. त्यानंतर चिरण्याने एकसारखे काप करून घ्या आणि एका कागदावर काप काढून घ्या.

  5. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने शंकरपाळीचे काप सोडा. ३-४ मिनिटे ते सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत तळून घ्या.

  6. अशाप्रकारे तुमची कुरकुरीत शंकरपाळी तयार झाली. ही शंकरपाळी २०-२५ दिवस चांगली टिकते.

NOTES

  1. शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तूप गरम करून घाला

  2. शंकरपाळी तळून थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे जास्त दिवस टिकून राहिल

Back to top button