आजचे राशिभविष्य (दि. २१ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २१ ऑगस्ट २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक स्तुतिसुमने उधळतील. कमिशन, लाभांश किंवा मानधनाद्वारे फायदे मिळतील.
वृषभ
वृषभ

वृषभ : आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
कर्क
कर्क

कर्क : वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ द़ृष्टीपथात असतील.
सिंह
सिंह

सिंह : प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्‍यांच्या दडपणाखाली वावरू नका.
कन्या
कन्या

कन्या : तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. डेटवर जाणार असाल, तर वाद टाळा.
तुळ
तुळ

तूळ : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : मित्रांचा आधार लाभेल आणि ते आनंदी ठेवतील. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि धनलाभ होऊ शकतो.
राशिभविष्य
धनु

धनु : जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे.
राशिभविष्य
मकर

मकर : कलात्मक क्षमतेमुळे कौतुकाची थाप मिळेल. जे लोक अनेक दिवसांपासून खूप व्यस्त होते. त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो.
कुंभ
कुंभ
कुंभ : कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा; अन्यथा प्रिय व्यक्तींशी संबंध दुरावू शकतील. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा.
मीन
मीन

मीन : कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बर्‍याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल.

Back to top button