आजचे राशिभविष्य (१७ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१७ मे २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. धनाची देवाणघेवाण होईल. तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. निर्णय घेताना घरातील लोकांचा सल्ला घ्या.
वृषभ
वृषभ

वृषभ : आध्यात्मिक गुरू अथवा वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल. जोडीदाराशी भांडण होईल; पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. नवीन उपक्रम हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.
कर्क
कर्क

कर्क : माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. घरातील स्थितीचा अंदाज बांधता येणार नाही. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची शक्यता.
सिंह
सिंह

सिंह : धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तणाव वाढला तरी आर्थिकद़ृष्ट्या फायद्यात राहाल.
कन्या
कन्या

कन्या : तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना घरातील लोकांचा सल्ला घ्या. त्यामुळे तणावमुक्त व्हाल.
तुळ
तुळ

तूळ : अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
राशिभविष्य
धनु

धनु : जे इतरांना मदत करतात त्यांना देवही मदत करतो, हे विसरून चालणार नाही. जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे दिवस खूप सुंदर जाईल.
मकर
मकर

मकर : रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. तुमचा मूड चांगला राहील. प्रियजनांमुळे तुमच्या आनंदात भर पडेल. मन प्रसन्न राहील.
कुंभ
कुंभ

कुंभ : आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैशाची कमतरता होऊ शकते.
मीन
मीन

मीन : महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

Back to top button