आजचे राशिभविष्य (२९ एप्रिल २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२९ एप्रिल २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : नैराश्य घालविण्यासाठी तुमचे हास्य उत्तम उपाय ठरेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. आर्थिक आवक चांगली.
वृषभ
वृषभ

वृषभ : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. व्यापारात नफा मिळण्याची शक्यता.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : मनातील विचार मांडण्यास कचरू नका. तुम्हाला जगातील सर्वात चांगली व्यक्ती असल्यासारखे वाटेल. भारावून जाल.
कर्क
कर्क

कर्क : आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. तणाव घेऊ नका.
सिंह
सिंह

सिंह : घरातील व्यक्ती आज बर्‍याच समस्या शेअर करतील; परंतु तुम्ही आपल्या नादामध्ये मस्त राहाल. इतरांची काळजी घ्या.
राशिभविष्य
कन्या

कन्या : तुम्हाला नफा होईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल, तरी ते तुमच्यावर नाराज असतील.
तुळ
तुळ

तूळ : दु:खी, कष्टी आणि निराश होऊ नका. ज्यांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता, त्यांना तो परत करावा लागू शकतो.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : गरजेच्या कामाला पूर्ण करून आज वेळ नक्कीच काढाल; परंतु यावेळचा उपयोग तुम्ही हिशेबाने करू शकणार नाही.
राशिभविष्य
धनु

धनु : आपले मत विचारल्यानंतर ते मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. मनोबल उंचावेल.
मकर
मकर

मकर : नातेसंबंध नव्याने द़ृढ करण्याचा दिवस. प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. मन उत्साही राहील.
कुंभ
कुंभ

कुंभ : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा.
मीन
मीन

मीन : आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात. खरेदी करण्यासाठी बाहेर पडाल.

Back to top button